नागपूर, 30 मार्च : नवरा बायकोच्या भांडणात किंवा थोड्याशा संशयाने अख्खा संसार उद्ध्वस्त होतो. अशीच एक दुर्दैवी घटना नागपुरात घडली. शनिवारी सकाळी महाजनवाडी भागात सचिन गोवर्धन वर या तरुणाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. पत्नी माहेरी राहते आणि तिचे कोणासोबत तरी प्रेम संबंध आहेत असा संशय सचिनला होता याच नैराश्यातून त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. सचिनचे सलोनी हिच्याशी 2015 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच सचिनला दारुचे व्यसन लागले. यामुळे नवरा बायकोमध्ये वाद व्हायचे.
हे वाचा-पुण्याच्या सफाई कामगाराच्या लेकरांचे हाल, 3 महिने वेतन नसल्याने होतेय उपासमार
गेल्या महिन्याभरापासून सचिन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानं पत्नीचे कुठल्यातरी युवकासोबत प्रेमसंबंध आहेत असा आरोपही केला होता. यावरूनच तो पत्नीशी वाद घालायचा आणि मारहाणही करायचा. या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेर गेली होती. सचिनने फोन करूनही तिला घरी बोलावण्याचा प्रयत्न केला पण पत्नीने त्यास नकार दिला.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी सचिनने पत्नीला फोन केल्याचंही समोर आलं आहे. यावेळी तिला परत येण्याची विनंती त्यानं केली. पण नकार देताच घराची चावी आणि एटीएम वहिनीकडं दिल्याचं सांगून फोन कट केला. त्यानंतर सचिनने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीनं घरी येण्यास नकार दिल्यानंतर गेल्या काही दिवस तो नैराश्यातच होता. त्यानंतर शुक्रवारी सचिननं घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाची नोंद पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.
हे वाचा-शेतकऱ्याने ते दु:ख सांगताच शरद पवार म्हणाले 'हा तर आता माझ्यासमोरही प्रश्न आहे..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.