मराठी बातम्या /बातम्या /देश /काश्मीर खोऱ्यातील सैनिकाच्या बापाची व्यथा; बेपत्ता मुलासाठी 8 महिन्यांपासून खणतोय जमीन

काश्मीर खोऱ्यातील सैनिकाच्या बापाची व्यथा; बेपत्ता मुलासाठी 8 महिन्यांपासून खणतोय जमीन

गेल्या 240 दिवसांपासून हा बाप आपल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या 240 दिवसांपासून हा बाप आपल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

गेल्या 240 दिवसांपासून हा बाप आपल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

श्रीनगर, 4 एप्रिल : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून एक बाप आपल्या तरुण मुलाचा शोध घेत आहे. मंजूर अहमद वागे (Manzoor Ahmad Wagay) गेल्या आठ महिन्यांपासून रोज जमीन खणत आहे. मात्र अद्याप त्यांना आपला मुलगा सापडू शकला नाही. खोदकाम करीत हा व्यक्ती आपल्या मुलाला शोध आहे. वागे यांचा मुलगा शाकिर मंजूर (Shakir Manzoor) टेरीटोरियल आर्मीमध्ये जवान होता. 2 ऑगस्ट रोजी त्याचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. तेव्हापासून 56 वर्षीय वडील जेथे मुलाचे रक्ताळलेले कपडे सापडले त्या जागेवरील जमीन खणत आहे.

वडिलांनी रडत रडत सांगितलं की, जेव्हा त्यांनी शेवटच्या वेळेस शाकिरला पाहिलं, तेव्हा ईद होती. तो घरी जेवायला आला होता. घरातून निघाल्यानंतर एका तासाने शाकिरने फोन करुन सांगितलं की, तो मित्रांसोबत जात आहे आणि सैन्यातील लोकांनी काही विचारलं तर त्यांना सांगू नये. त्यावेळी त्याचं अपहरण झालं होतं आणि अपहरणकर्त्यांनी त्याला शेवटचा फोन करण्याची परवानगी दिली होती. दुसऱ्या दिवशी कुलगाममध्ये शाकिरची गाडी जळालेल्या अवस्थेत मिळाली. एका आठवड्यानंतर 3 किमी अंतरावर लधुरा येथे शाकिरचे रक्ताने माखलेले कपडे सापडले.

हे ही वाचा-घटनास्थळी जवानांच्या मृतदेहांचा खच, Ground Report मधून धक्कादायक चित्र समोर

वागे यांनी सांगितलं की, त्यांची भाची उफैरा हिने सांगितलं की, तिचा भाऊ शाकिर स्वप्नात आला होता. यावेळी शाकिरने सांगितलं की, त्याचं शरीर त्याचं जागी दफन करण्यात आलं आहे, जेथे त्याचे कपडे सापडले होते. वागे आपल्या शेजारच्यांना घेऊ तेथे मुलाचा मृतदेह शोधत आहेत. ते गेल्या 8 महिन्यांपासून खोदकाम करीत होते. 30 लोकांसोबत आम्ही खोदकाम केलं, तासनतास खोदल्यानंतर आम्हाला रिकाम्या हाताने जावं लागलं. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वागे यांनी दावा केला आहे की, त्यांना माहीत आहे की, तिच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. ते चार दहशतवादी होते. ते सर्वजण एनकाऊंटरमध्ये मारले गेले आहेत. हा तरुण सैनिक गायब झाल्यानंतर काही दिवसांनंतर सोशल मीडियावर एक ऑडियो क्लिप व्हायरल करीत दहशतवाद्यांनी याची जबाबदारी घेतली.

First published:

Tags: Indian army, Jammu kashmir