नवी दिल्ली, 21 मार्च : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. पण, सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांनीच घेतला होता, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांनी केला आहे. ‘परमबीर सिंग यांनी पत्रात माझा उल्लेख केला आहे आणि आम्ही भेटलो देखील आहे. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांनीच घेतला होता. सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतला नाही’ असंही शरद पवार म्हणाले. ‘राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले आहे हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या पत्राचे दोन भाग आहे. त्यांच्या पत्रामध्ये, प्रत्यक्ष पैसे जमा करण्याविषयी कोणतीही माहिती नाही. हे पैसे कुठून घेतले आणि ते कधी हस्तांतरित केले गेले, याविषयी पत्रात काहीही सांगण्यात आले नाही. त्या पत्रावर परमबीर यांची सही नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी मोदी सरकार देणार 7 लाख; असा करा अर्ज
तसंच’बदली केल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहे. जे आरोप परमबीर सिंग यांनी लगावले आहेत त्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण अधिकार आहे. ही अत्यंत संवेदनशील आणि चुकांची मालिका असून यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. याची चौकशी झाली पाहिजे, असा सल्ला माझा आहे. ज्युलिओ रिबेरो अशा उत्तम अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हे सुचवणार आहे. माझ्या सूचना स्वीकारल्या जातील की नाही हे मला ठाऊक नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. ‘सरकारवर या प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. या प्रकरणाचा शासन हा गांभीर्याने घेत आहे, असंही पवारांनी सांगितले. आजीनं तंबाखूचं सेवन करण्यास केली मनाई, नऊ वर्षाच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आमच्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतली. यावर अजून चर्चा झाली नाही, चर्चा करू. तसंच या प्रकरणी मी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केले. ‘आज निवासस्थानी दिल्लीत बैठक घेण्याच्या संदर्भात, माझ्याशी अशी कोणतीही वेगळी भेट नाही. एक पूर्व नियोजित वेगळी बैठक आहे, जी आज होईल. अनिल देशमुख यांच्या विषयावर जे काही निर्णय घेईल, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी बोलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील’ असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

)







