जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! आजीनं तंबाखूचं सेवन करण्यास केली मनाई, नऊ वर्षाच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! आजीनं तंबाखूचं सेवन करण्यास केली मनाई, नऊ वर्षाच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! आजीनं तंबाखूचं सेवन करण्यास केली मनाई, नऊ वर्षाच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

आजीनं तंबाखू आणि गुटखा खाण्यास मनाई केल्यानं या मुलीनं फाशी घेत आत्महत्या (Minor Girl Commit Suicide) केली आहे. या मुलीच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायपूर 21 मार्च : आजकाल विविध वाईट गोष्टींची व्यसनं तरुणाईसह लहानांनादेखील आकर्षित करत आहेत. या गोष्टी दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालल्या आहेत. याच संदर्भतील एक थक्क करणारी घटना आता छत्तीसगडमधून समोर आली आहे. छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तंबाखूमुक्ती अभियान राबवलं जात आहे. अशातच सरगुजा जिल्ह्यात एका नऊ वर्षाच्या मुलीनं तंबाखू आणि गुटखा खाण्यास मनाई केल्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. आजीनं तंबाखू आणि गुटखा खाण्यास मनाई केल्यानं या मुलीनं फाशी घेत आत्महत्या (Minor Girl Commit Suicide) केली आहे. आजीनं मनाई केल्यानं नाराज असलेल्या या मुलीनं ओढणीने फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या मुलीच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय पोलीस आणि गावातील लोकही हैराण आहेत. सरगुजा जिल्हा एक एप्रिलपासून तंबाखूमुक्त बनवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अभियान सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग लोकांमध्ये याबाबत जनजागृती करत असून तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लोकांना माहिती देत आहेत. मात्र, ग्रामीण भागांमध्ये या अभियानाचा तितका परिणाम दिसून येत नाही. अशातच आता सरगुजामधील सीतापूर ठाणा क्षेत्रातील भिठुआ गावातील नऊ वर्षाच्या मुलीनं आजीच्या सल्ल्यानं नाराज होत टोकाचं पाऊल उचललं आहे. सीतापूर ठाण्याचे प्रभारी रुपेश नारंग यांनी सांगितलं, की भिठुआ ग्रामपंचायत क्षेत्रातील नऊ वर्षीय मुलीनं घराच्या मागील बाजूस फाशी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आत्महत्येचं कारण ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला. पोलिसांनी तात्काळ मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तिच्या आजीला ठाण्यात बोलावून विचारपूस केली. यावेळी आजीनं सांगितलं, की त्यांची नऊ वर्षाची नात तंबाखू आणि गुटख्याचं सेवन करायची. मागील काही दिवसांपूर्वी आजीनं आपल्या नातीला या गोष्टींचं सेवन न करण्याचा सल्ला दिला. याच गोष्टीमुळे नाराज होत तिनं टोकाचं पाऊल उचललं. मुलीच्या आजीच्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात