जाहिरात
मराठी बातम्या / देश / पिगी बँकेत नाणी जमा करून मजुरानं खरेदी केली Scooty, पोत्यात पैसे घेऊन पोहोचला शोरूमला

पिगी बँकेत नाणी जमा करून मजुरानं खरेदी केली Scooty, पोत्यात पैसे घेऊन पोहोचला शोरूमला

पिगी बँकेत नाणी जमा करून मजुरानं खरेदी केली Scooty, पोत्यात पैसे घेऊन पोहोचला शोरूमला

उपेनला आपल्याकडे स्वतःची दुचाकी असावी असं खूप वाटायचं. 8 वर्षांनंतर, जेव्हा त्यानं आपल्या पिगी बँकेतून पैसे काढले, तेव्हा आपण एवढे पैसे वाचवल्याचं कळल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. त्यानं हे पैसे पोत्यामध्ये भरले आणि शोरूममध्ये जाऊन स्वतःच्या कमाईची स्कूटी विकत घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 6 एप्रिल : आसाममधील गुवाहाटीच्या बोरागाव इथं राहणाऱ्या उपेन राय यानं 8 वर्षं पैसे साठवून आपलं स्कुटी घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. उपेन हा रोजंदारीवर काम करतो. त्यानं साधारण आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2014 मध्ये पिगी बँक विकत आणली. तो रोज या पिगी बँकेत नाणी ठेवू लागला. कधी तो त्यात 1 रुपया टाकायचा तर, कधी 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी टाकायचा. तेव्हापासून त्याचं स्वतःची नवी दुचाकी घेण्याचं स्वप्न होतं. अखेर 5 एप्रिलला हे स्वप्न पूर्ण झालं आणि उपेननं स्वतःसाठी एक स्कूटी घेतली. 8 वर्षांनंतर, जेव्हा त्यानं आपल्या पिगी बँकेतून पैसे काढले, तेव्हा त्याचे 1.5 लाख रुपये झाले होते. आपण एवढे पैसे वाचल्याचं कळल्यानंतर उपेनला खूप आनंद झाला. यानंतर उपेननं आपल्या कष्टाचे पैसे पोत्यामध्ये भरले आणि एका डीलरकडे जाऊन पांढऱ्या रंगाची स्कूटी विकत घेतली. एका दुकानदारानंही नाणी साठवून घेतली होती स्कूटी उपेन राय यांच्याप्रमाणेच आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील एका दुकानदारानं रोज नाणी साठवून एक नवीन स्कूटर खरेदी केली होती. ही बातमी सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली. एका यूट्यूबरनं फेसबुकवर त्याचे काही फोटो शेअर केल्यावर ही बाब समोर आली. हे वाचा -  16 हजार प्रवासी,1 कोटींची दंड वसूल; कोण आहे ‘हा’ रेल्वेची तिजोरी भरणारा TTE अशाच प्रकारे तामिळनाडूत एका तरुणानं 1 रुपयांची नाणी देऊन खरोदी केली 2.6 लाखांची दुचाकी काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील सेलम येथे राहणाऱ्या वालेव्ही बुबाथी यांनीही नाणी जमा करून स्वत:साठी ‘ड्रीम बाइक’ खरेदी केली होती. बुबाथीनं 3 वर्ष पैसे जमा करून 2.6 लाख रुपयांची बाईक घेतली. मोटारसायकल शोरूमच्या कर्मचाऱ्यांना बुबाथी याची तीन वर्षांची बचत मोजण्यासाठी तब्बल 10 तास लागले होते. हे वाचा -  देशात अजूनही Corona लसीचा पहिला डोस न घेतलेल्यांचा आकडा ऐकून फुटेल घाम बीसीएची पदवी घेतलेला बुबाथी 4 वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत संगणक ऑपरेटर म्हणून कामाला होता. नंतर त्यानं नोकरी सोडली आणि स्वतःचं YouTube चॅनल सुरू केलं. त्‍यानं त्‍याच्‍या युट्यूब चॅनलवर आपण नाणी देऊन बाईक कशी विकत घेतली, याचा व्हिडिओही अपलोड केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात