पटना (बिहार) : पटना जंक्शनवरील एका TTE (ट्रेन टिकट एग्जामिनर) शशी कुमार यांनी ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. फक्त एका वर्षात त्यांनी 1 कोटी 11 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. हा दंड त्यांनी वर्ष 2021-22 या कालावधीमध्ये 16 हजार 423 प्रवाशांकडून वसूल केला आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांनी 45 प्रवाशांकडून दंड वसूल केला. ईस्ट सेंट्रल रेल्वे (ECR) च्या पाच विभागात इतका दंड वसूल करणारे ते एकमेव TTE आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक रेल्वेच्या सर्व स्तरावरील अधिकारी करत आहेत. पूर्ण झोन मध्ये तिकिट तपासणी करणाऱ्या स्टाफमधील हा सर्वोच्च स्कोर आहे.
वेगवेगळे अभियान राबविले
शशी कुमार यांनी सांगितले की, रेल्वेकडून अजून कोणालाच कोणत्याच प्रकारचे टार्गेट दिले गेलेले नाही. सर्वजण आपापली जबाबदारी पार पाडतात. ते म्हणाले, की त्यांनी फक्त हे दंड वसूलीचे काम थोड्या वेगळ्या पद्धतीने केले. ते प्रत्येक दिवशी 30 पेक्षा जास्त रेल्वे तपासून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांना पकडतात. अशा प्रकारे शशी कुमार पटना ते बक्सर या दरम्यान, तपासणी अभियान राबवितात. विना तिकिट प्रवास करणारे त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्यावर शशी कुमार यांची नजर असते.
एकीकडे कोरोना काळात रेल्वे बंद होत्या. त्याचवेळी तर हीच वेळ रेल्वेसाठी एक संधी बनून आली. शशी कुमार यांनी सांगितले की, एका TTE ला दोन प्रकारचे पैसे मिळतात. एक म्हणजे विना तिकिट प्रवास करणाऱ्यांना 250 रुपये दंड आणि दुसऱ्या तिकिटाचे पैसे. कोरोना काळात अनेक लोकांनी तिकिट बनविण्यासाठी लोकांनी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक हिजाब वादात आता थेट अल-कायदाची उडी; अल-जवाहिरीने केलं मुस्कानचं कौतुक!
अनेक तरुण-तरुणींना दिली प्रेरणा
तिकिट तपासणी दरम्यान अनेक गोष्टींवर नजर ठेवावी लागते. ते म्हणाले, मागच्या वर्षी त्यांनी सहा वर्षाच्या मुलीला विकण्यापासून वाचविले होते. कोइलवर येथील मुलीला तस्करीच्या स्वरुपात विकण्यासाठी घेऊन जात होते. मात्र, तिकिट तपासणीच्या निमित्ताने त्यांनी तिला पकडले. इतकेच नव्हे तर घरातून पळून जाणाऱ्या दोन डजनहून अधिक तरुण-तरुणींना त्यांनी प्रेरणा देऊन घरी परत पाठविले आहे.
शशी कुमार यांना कार्य तत्परतेसाठी रेल्वेने याआधीही सन्मानित केले आहे. त्यांनी सांगितले की, 6 मार्च 2022ला दानापूर मध्ये ड्यूटीवर असताना त्यांनी पाहिले की, एका व्यक्तीने हाय टेंशन वायरला लटकून आत्महत्येचा प्रयत्न केला. युवक करंट लागल्यावर तडपत होता. मात्र, तेव्हा त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता त्याला खाली उतरवले, त्याला रुग्णालयात दाखल केले. आता तो तरुण पूर्णपणे सुरक्षित आहे.
पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात तैनात मुख्य तिकिट निरीक्षक आशीष यादव यांनी एक एप्रिल 2021 पासून 9 मार्च पर्यंत 20,600 प्रवाशांकडून 1.70 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. देशात सर्वात जास्त दंड वसूल करणारे ते आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शम्स आहेत. मागच्या 12 महिन्यात त्यांनी 15,840 विना तिकिट प्रवास करणाऱ्यांना पकडले आहे. तसेच त्यांच्याकडून 1.25 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शशी कुमार आहेत. TTE ला दंड वसूल केल्यानंतर आता कोणत्याही प्रकारचा इंसेंटिव मिळत नाही. ही व्यवस्था आधी होती. मात्र, आता ती बंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Patna, Railway