डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनविरोधात एल्गार; व्यापार करारावर उचललं पाऊल

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनविरोधात एल्गार; व्यापार करारावर उचललं पाऊल

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाचा विषाणूमुळे अमेरिकेतील 31 लाख जणांना कोरोनाची लागण झाली तर 1,30,000 जणांचा मृत्यू झाला

  • Share this:

वॉशिंग्टन, 11 जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या चीनबरोबर दुसरा टप्पातील व्यापार करार नाकारला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावावर सामोरे जाण्याबाबत बीजिंगच्या धोरणांवर ठपका ठेवला आणि म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरित्या बिघडले आहेत.

शुक्रवारी एअर फोर्स वनशी झालेल्या चर्चेत ट्रम्प म्हणाले की, चीनबरोबरचे संबंध बिघडू लागले आहेत आणि ते सध्या याबद्दल विचार करत नाहीत.

यावर्षी दोन्ही देशांमध्ये मोठा करार

या वर्षाच्या सुरूवातीस, दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतर अमेरिकेने चीनबरोबर एक मोठा करार केला. कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात बराच संघर्ष सुरू आहे आणि परिस्थिती बिघडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोविड - 19 च्या चीनच्या नियंत्रण धोरणावर सवाल उपस्थित करीत आहे.

हे वाचा-चीनचं स्वप्न झालं उद्ध्वस्त; अंतराळात पाठवलेलं सॅटेलाइट झालं फेल

चीनशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेने केले प्रश्न उपस्थित

हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादणे, अमेरिकन पत्रकारांवर बंदी घालणे, उइगर मुस्लिमांवरील चिनी धोरणे आणि तिबेटमधील सुरक्षा उपाय या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. चीनमध्ये प्लेग रोग पसरल्याबद्दल तरूम यांनीही आपला संताप व्यक्त केला आणि म्हटले की चीन प्लेगला पसरण्यापासून रोखू शकला असता परंतु त्यांनी ते थांबवले नाही आणि कोरोनाच्या बाबतीतही तेच घडले आणि तेथूनच त्याचा प्रसार संपूर्ण देशात होऊ दिला.

चीनमधील वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोनो विषाणूमुळे अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग 31 लाख लोकांना झाला आहे आणि त्यामुळे 1,30,000 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading