थायलंड, 06 जुलै: थायलंड गुहेत अडकलेले 12 फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या परीक्षकांच्या बचाव कार्यात ऑक्सिजन संपल्यामुळे माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू झाला आहे. गुहेमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे माजी अधिकारी सामन कुनोंट यांचा सकाळी 2 वाजता गुदमरून मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून चियांग राय परिसरातील थांम लुआंग नांग नोन या गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेही वाचा: ५६ इंच छातीपेक्षा छातीवर किती मेडल आहेत त्याला अधिक महत्व- उद्धव ठाकरे संपूर्ण टीम बेपत्ता झाल्याचे कळल्यावर त्यांचा शोध घेण्यात आला. नऊ दिवसांनंतर ही संपूर्ण टीम गुहेत अडकल्याचे कळले. तेव्हापासून सर्वांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. कुनोंट ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे गुहेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. गुहेतून बाहेर येताना ते बेशुद्ध झाले. एका सहकाऱ्याच्या मदतीने त्यांना गुहेच्या बाहेर काढण्यात आले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. बचाव कार्यात आम्ही आमच्या एका अधिकाऱ्याला गमावले आहे. पण तरी आम्ही हे कार्य तडीस नेऊ याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही आमचं काम सुरूच ठेवणार आहोत. हेही वाचा: सट्टेबाजीला अधिकृत करण्याची विधी आयोगाची शिफारस संपूर्ण फुटबॉल टीम आणि बचाव कार्यासाठी डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. मुलांना शारीरिक आणि मानसिकरित्या अधिक सशक्त करण्याकडे भर देण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेच मुलांना गुहेमध्येच पोहण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलांना या साऱ्या गोष्टी अगदी कमी वेळेत शिकाव्या लागणार असल्याची माहिती थायलंडचे उपपंतप्रधान प्रावित वोंगसुवान यांनी दिली. ‘13 लोकांना एकत्र बाहेर काढणं अशक्य नाही. जर त्यांचे स्वास्थ्य ठीक असेल आणि ते बाहेर येण्यासाठी पूर्णपणे तयार असतील तरच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यांची मनःस्थिती पाहिल्याशिवाय आम्ही कोणतेच पाऊल उचलणार नाही,’ असे चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसक ओसातानाकोर्न यांनी बुधवारी सांगितले. हेही वाचा: मदर तेरेसांच्या संस्थेतून झाली मुलांची विक्री, संशयितांना अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.