जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मू-काश्मीरमध्ये CRPF पार्टीवर दहशतवादी हल्ला, शहराबाहेर आखला कट; एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF पार्टीवर दहशतवादी हल्ला, शहराबाहेर आखला कट; एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF पार्टीवर दहशतवादी हल्ला, शहराबाहेर आखला कट; एक जवान शहीद

दहशतवाद्यांनी शहराबाहेर जवानांवर गोळीबार केला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 25 मार्च : जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी (25 मार्च) दहशतवाद्यांनी श्रीनगर शहराबाहेरील भाग लवेपोरा येथील सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला आणि सुरक्षा दलावर बेछुट गोळीबार केला. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे. (Terrorist attack on CRPF party in Jammu and Kashmir)

Jammu and Kashmir: Terrorists attack CRPF party in Lawaypora area on the outskirts of Srinagar city. Details awaited.

— ANI (@ANI) March 25, 2021

हे ही वाचा- एक वर्षाच्या चिमुरडीने दिला बापाला मुखाग्नी; 5 जवान शहीद झाल्याने देश हळहळला सुरुवातील तीन जवान जखमी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नव्या अपडेटनुसार आतापर्यंत 4 जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. (Terrorist attack on CRPF party in Jammu and Kashmir ) दरम्यान सीआरपीएफचे एक सब इन्स्पेक्टर शहीद झाले आहेत. तर एक अद्याप गंभीर असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. श्रीनगर येथील DIG ऑपरेशन्स किशोर प्रसाद यांनी News18 ला यासंदर्भात माहिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात