बेंगळुरू, 12 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात असतानाही काहीजण ऐकत नसल्याचं दिसत आहे. असा परिस्थितीत पोलिस आणि प्रशासन कठोर कारवाई करताना दिसत आहे. त्यातही या लॉकाडाऊनमध्ये बाहेर पडण्यासाठी लोक वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. आता मित्राच्या घरी जाण्यासाठी अजब जुगाड करणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे. कर्नाटकातील मंगळूरूत एका मुलाला घरात बसून कंटाळा आला होता. त्याला मित्राकडे जायचं होतं पण रस्त्यावर पोलिस होते. त्यामुळे मित्राकडे जाण्यात अडचण होती. त्यावेळी एका मित्राने दुसऱ्याला भेटण्यासाठी जो जुगाड केला तो आश्चर्यचकीत करणारा होता. मित्राकडे जाण्यासाठी त्यानं स्वत:ला सुटकेसमध्ये बंद करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या मित्राने त्याच्या घरी येऊन सुटकेत घरी नेली. तिथं गेल्यावर मित्राला सुटकेसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. ही घटना आर्य समाज रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये घडली. एक महिना झालं मुलापासून आई दूर आहे’, महिला पोलिसाच्या पतीची भावनिक पोस्ट लॉकडाऊनमुळे अपार्टमेंटमध्ये इतर लोकांना येण्या-जाण्यास बंदी होती. त्यामुळं मित्राच्या घरी जाण्यासाठी सुटकेसचा प्लॅन केला. त्यानंतर मित्राला सुटकेसमध्ये बसवलं आणि अपार्टमेंटमध्ये घेऊन जात होता तेव्हा वजनामुळे धडपडला. यामुळे लोकांनाही संशय आला. त्यानंतर अपार्टमेंटमधील लोकांनीच सुटकेस उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. सुटकेसमधून त्या मुलाला बाहेर काढलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी कऱण्यासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. हे वाचा : मुंबईतील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रोहित पवारांचा अॅक्शन प्लान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.