मुंबई, 28 मार्च : लहान मुलांना पौष्टिक खाणं कसं द्यायचं हा आई-वडिलांपुढे मोठा प्रश्न असतो. कारण, अनेक मुलं हे खाणं खाण्यास टाळाटाळ करतात. पण, आता त्यांचं हे टेन्शन दूर होणार आहे. कारण, दोन विद्यार्थिनींनी चक्क खाद्यपदार्थांपासून स्लेट पेन्सिल (पाटीवर लिहिण्याची पेन्सिल तयार केलीय. या संशोधनाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. इंडियन सायन्स काँग्रेसमध्येही त्यांच्या या संशोधनाला मान्यता मिळाली आहे.
काय आहे संशोधन?
हरिप्रिया आणि अफसियान सुलताना अशी या विद्यार्थिनींची नावं आहेत. त्या तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील सरकारी हायस्कूलमध्येत् नववीत शिकत आहेत. बहुतेक मुलं वाचताना आणि लिहिताना स्लेट पेन्सिल तोंडात टाकतात आणि खातात आणि ती आजारी पडतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मुलांसाठी पौष्टिक पदार्थ असलेली पेन्सिल करण्याचा निर्णय घेतला.
लेकीच्या नावानं सुरु केला व्यवसाय, ग्रामीण भागातील महिला बनली 'पॅड वुमन', Video
या दोन्ही मुलींनी आपली कल्पना शिक्षिका सुनीता यांना सांगितली. सुनिता यांनी त्या कल्पनेचं कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर त्यांनी सुका मेवा, तांदळाचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर, गूळ आणि तीळ पूड यांसारख्या खाद्यपदार्थांपासून स्लेट पेन्सिल तयार केली.
या खाण्यायोग्य स्लेट पेन्सिलची रचना अशा प्रकारे केली आहे की, मुलं सामान्य स्लेट पेन्सिलप्रमाणे ती लिहिण्यासाठी वापरू शकतात आणि कँडीप्रमाणे चघळूदेखील शकतात. हरिप्रिया आणि अफसियान सुलताना यांनी त्यांच्या प्रकल्पाला 'स्लेट पेन्सिल खाल्ल्यानं उद्भवणाऱ्या अडचणींपासून सुटका' असं नाव दिलं आणि त्याचं मॉडेल एका विज्ञान प्रदर्शनात सादर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल उदघाटन झालेल्या नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये तेलंगणा राज्याच्या प्रतिनिधी म्हणून हरिप्रिया आणि अफसियान सुलताना यांनी आपला प्रकल्प सादर केला. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी त्यांची मॉडेल्स प्रदर्शित केली होती.
मुलासाठी काहीही, बापाने चक्क भंगारातून बनवली भन्नाट इलेक्ट्रिक बाईक, PHOTOS
या विद्यार्थिनींच्या मार्गदर्शक आणि विज्ञान शिक्षिका सुनीता यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, या दोन्ही विद्यार्थिनींना नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये त्यांच्या मॉडेलसाठी मेडल आणि प्रमाणपत्र मिळालं आहे. पेन्सिल मॉडेल बनवणाऱ्या दोन विद्यार्थिनींपैकी एक अफसियान सुलताना म्हणाली की, तिची धाकटी बहीण नेहमी पोटदुखीची तक्रार करत असे. तिच्या पोटदुखीचं कारणं तिची स्लेट पेन्सिल चघळण्याची सवय आहे, हे अफसियानला माहीत होतं.
त्यानंतरच तिच्या मनात अशी स्लेट पेन्सिल बनवण्याची कल्पना आली, हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी त्यांच्या शाळेतील विज्ञान शिक्षकांनी खूप मदत केली, असं हरिप्रियानं सांगितलं. खाण्यायोग्य स्लेट पेन्सिल बनवल्याबद्दल सामान्य लोकही या दोन विद्यार्थिनींचं आणि शाळेचं कौतुक करत आहेत. कारण या प्रकल्पामुळे स्लेट पेन्सिल खाणाऱ्या मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, School children, Telangana