तेलंगणा, 23 जून : कोरोना लॉकडाऊनचा (corona lockdown) फटका कित्येकांना बसला आहे. अनेक कंपन्यांना नुकसान झाल्याने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं सुरू केलं. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. अशीच वेळ ओढावली ती तेलंगणातील (telangana) एका शिक्षकावर (teacher). कोरोना लॉकडाऊनमध्ये त्याने आपली शिक्षकाची नोकरी गमावली आणि आता या शिक्षकावर डोसा विकण्याची वेळ ओढवली आहे.
रामबाबू मारागनी असं या शिक्षकाचं नाव आहे. आपल्या पत्नीसह त्यांनी डोसा विक्री करणं सुरू केलं आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार रामबाबून तेलंगणातील खम्मम शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक होते. कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली आणि आता आपलं पोट भरण्यासाठी त्यांना डोसा विकावा लागतो आहे. रस्त्याशेजारी त्यांनी डोसा विक्रीची गाडी लावली आहे आणि यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यात त्यांची पत्नीही त्यांना साथ देते आहे.
Telangana: Rambabu Maragani, who was a teacher at a private school in Khammam, is now running a food cart with his wife, after he lost his job due to COVID19 pandemic. He says, "Do not depend on anyone. Stand on your own feet". pic.twitter.com/ZgUAygHurG
विशेष म्हणजे शिक्षक असूनही डोसा विकणं हे रामबाबू यांना कमीपणाचं वाटत नाही, 'कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहणं चांगलं', असं ते म्हणाले.
Hats off to his pragmatic approach to life with zero regards to what other guys will make of it. It takes enormous courage for a teacher to do something like running a food stall in public.
या शिक्षकाचं कौतुक सर्वांनी केलं आहे. एक शिक्षक असून फूड स्टॉल चालवणं, यासाठी खरंच धैर्य लागतं, असं एका युझर्सने म्हटलं आहे. तर एकाने म्हटलं, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, हे या शिक्षकाने दाखवून दिलं. एकंदर सर्वांनी या शिक्षकाबाबत अभिमान व्यक्त केला आहे.