Home /News /national /

कोरोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या केरळचा जगात दबदबा; 'रॉकस्टार' आरोग्यमंत्र्यांची UN वारी

कोरोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या केरळचा जगात दबदबा; 'रॉकस्टार' आरोग्यमंत्र्यांची UN वारी

जगभरात कोरोनाचा कहर असताना भारतातील केरळ राज्यात कोरोनाला रोखण्यात आरोग्यमंत्र्यांना यश आलं आहे

    नवी दिल्ली, 23 जून : जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना भारतातील केरळ या राज्याला कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य झाले. याचं श्रेय केरळच्या आरोग्यमंत्र्यांना दिलं जात आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी आपल्या कर्तृत्वाने केरळला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखलं. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांचं कौतुक केलं जात आहे. त्यातच आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. शैलजा यांना यूएनच्या पब्लिक सर्विस डेनिमित्ताने व्याख्यान देण्यासाठी बोलवले आहे. ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. भारतातून केवळ केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजा यांना यूएनकडून आमंत्रण आलं असल्याचे सांगितले जात आहे. द विकमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कोरोना - 19 मध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसशी (Coronavirus) दोन हात करण्यासाठी केरळच्या आरोग्य मंत्र्यांची (Heath Minster) चर्चा परदेशी मीडियामध्ये सुरू आहे. यापूर्वीही कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी केके शैलजा (K.K.Shailja) यांचं कौतुक केलं जात आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'मध्ये त्यांच्याबाबतचा लेख छापून आल्यानंतर त्या रॉकस्टार झाल्या आहेत. यामध्ये केके शैलजा यांनी कोरोनाशी दोन हात करण्याबरोबरच अनेक विषयांवर चर्चा केली. हे वाचा-गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले; सायबर विभागाकडून नियमावली जारी पहिला रुग्ण येण्यापूर्वीच सुरू होती तयारी भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 31 जानेवारी रोजी समोर आला होता. 11 दिवसांपूर्वी केरळचे आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी वुहानमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसबाबत माहिती जमा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या एक सहयोगीला हा व्हायरस भारतात येण्याची शक्यता विचारली होती. त्यावर 'हो' उत्तर आल्यानंतर त्यांनी कोरोना विरोधात तयारी सुरू केली. ठीक 11 दिवसांनंतर या व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये समोर आला.
    First published:

    Tags: Corona virus in india, Health minister, Keral

    पुढील बातम्या