Coronavirus ला मारून टाकणारा ड्रग मॉलिक्यूल सापडला; टेक महिंद्रा फाइल करणार पेटंट

Coronavirus ला मारून टाकणारा ड्रग मॉलिक्यूल सापडला; टेक महिंद्रा फाइल करणार पेटंट

Coronavirus चं बदलतं स्वरूप, तिसऱ्या लाटेचा धोका आणि अद्याप कमी न होणारे हादरवणारे कोरोनाबळींचे आकडे यात एक बरी बातमी आली आहे. कोरोनाचा खात्मा करणारा मॉलिक्यूल सापडला आहे आणि तेही देशी संशोधकांना.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे: Coronavirus ची बदलती रूपं (Mutation new strain of virus) आणि त्यामुळे दररोज वाढलेली रुग्णसंख्या (Coronavirus India crisis), मृत्यूचे हादरवणारे आकडे यात एक बरी बातमी आली आहे. कोरोनाव्हायरस होऊ नये म्हणून लस आलेली आहेच, आता त्यातून कोरोन झालाच तर त्याला मारून टाकणारं औषधही लवकरच येत आहे. Tech Mahindra या आयटी कंपनीने रीगेन (Reagene Biosciences) नावाच्या औषध निर्माण कंपनीबरोबर मिळून एक ड्रग मॉलिक्यूल शोधल्याचा दावा केला आहे. हा मॉलिक्यूल कोरोना व्हायरसला मारून टाकू शकतो, असा दावा आहे. औषधासाठी कंपनी पेटंट दाखल करणार आहे.

टेक महिंद्राच्या मेकर्स लॅब याचे ग्लोबल हेड निखील मल्होत्रा यांनी PTI शी बोलतना याबद्दल सांगितलं. "आम्ही आणि पार्टनर संशोधक रीगेनने असा मॉलिक्यूल शोधला आहे, ज्यात कोरोनाव्हायरसला संपवण्याची ताकद आहे. आम्ही पेटंटसाठी अर्ज केल्याशिवाय या औषधाचं नाव जाहीर करू शकत नाही."

Good News मुंबई 1 जूनपासून येऊ शकते रुळावर, 1 जुलैपासून शाळाही शक्य पण...

मेकर्स लॅब ही टेक महिंद्राची रिसर्च विंग आहे. मल्होत्रा त्याचे प्रमुख आहे. त्यांनी गेल्या काही काळात 8000 ड्रग मॉलिक्यूल्सचा अभ्यास करून एक असं मॉलिक्यूल शोधलं आहे जे कोरोनाव्हायरसवर परिणामकारक आहे. यासंबंधी बंगळुरूमध्ये संशोधन सुरू होतं.

या मॉलिक्यूलचे प्रयोग करण्यासाठी फुफ्फुसाचं एक 3D मॉडेल तयार करण्यात आलं. बायलॉजिकल कॉम्प्युटेशनचा वापर करून या औषधाची परिणामकारकता तपासण्यात आली आहे. "अजून या औषधाच्या आणखी चाचण्या बाकी आहेत. अॅनिमल टेस्टिंगही करावं लागेल. औषधाचा प्रभाव तपासणाऱ्या इतर चाचण्या करण्यासाठीच आम्ही आधी पेटंट फाइल करणार आहोत", असं मल्होत्रा यांनी सांगितलं.

दरम्यान, लसीकरणाचा वेग वाढवला तर मुंबईत दोन महिन्यात कोविड आटोक्यात येऊ शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

TIFR म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं केलेल्या संशोधनातून एक निष्कर्ष काढला आहे. त्या निष्कर्षानुसार 1 जूनपर्यंत मुंबईमधील मृत्यूदरही आवाक्यात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मुंबई शहरातील नागरिकांचं लसीकरणाचं प्रमाण तोपर्यंत 75 टक्के व्हायला हवं. म्हणजेच मुंबईमध्ये जर महिनाभरामध्ये जवळपास 20 लाख नागरिकांचं लसीकरण झालं तर मृत्यूदर हा कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. म्हणजे एक जूनपासून जनजीवन काहीसं समान्यपणे सुरू होऊ शकतं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: May 3, 2021, 4:16 PM IST

ताज्या बातम्या