Good News मुंबई 1 जूनपासून येऊ शकते रुळावर, 1 जुलैपासून शाळाही सुरू करणं शक्य पण...

Good News मुंबई 1 जूनपासून येऊ शकते रुळावर, 1 जुलैपासून शाळाही सुरू करणं शक्य पण...

TIFR Institute अहवालामध्ये मुंबईत लसीकरणाचं प्रमाण जर ठरावी क्षमतेपर्यंत पोहोचलं तर जूनमध्ये गाडी रुळावर येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे: मुंबईमध्ये कोरोची (Mumbai Corona situation) स्थिती अत्यंत गंभीर अशी बनली होती. ही स्थिती सध्या काहीशी आवाक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसंच पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही (Positivity Rate) घटत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण मृत्यूदर ही देखिल चिंतेची बाब आहे. पण TIFR च्या एका रिपोर्टनुसार, मृत्यूदरही 1 जूनपर्यंत आटोक्यात येऊ शकतो. मात्र. त्यासाठी काही गोष्टी होणं गरजेचं आहे. (Mumbai Vaccination Drive)

(वाचा-फळं घ्यायला कोविड सेंटर सोडून कोरोनाबाधित फिरताय मोकाट, बीडमधला VIDEO)

TIFR म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं केलेल्या संशोधनातून एक निष्कर्ष काढला आहे. त्या निष्कर्षानुसार 1 जूनपर्यंत मुंबईमधील मृत्यूदरही आवाक्यात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मुंबई शहरातील नागरिकांचं लसीकरणाचं प्रमाण तोपर्यंत 75 टक्के व्हायला हवं. म्हणजेच मुंबईमध्ये जर महिनाभरामध्ये जवळपास 20 लाख नागरिकांचं लसीकरण झालं तर मृत्यूदर हा कमी होण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. म्हणजे एक जूनपासून जनजीवन काहीसं समान्यपणे सुरू होऊ शकतं.

(वाचा-महाराष्ट्रासाठी एप्रिल धडकी भरवणारा; महिन्यात 21 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गणितीय अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे मॉडेल मांडलं आहे. जर कोरोना लसीकरण मोहीम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिली. तसंच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला नाही तर 1 जुलैपासून शाळा सुरू करणंही शक्य असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

TIFR संस्थेचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या परिस्थितीवरून लावलेला हा अंदाज आहे. त्यात बदलही होऊ शकतात. हा आतापर्यंतचा अंदाज आहे. जुलै महिन्यात याचा नेमका अंदाज येऊ शकेल असंही ते म्हणाले आहेत. मात्र कोरोनाची एकूण परिस्थिती लसीकरणाची शक्यता याआधारे त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे. तसं शक्य असल्यास मुंबईच काय राज्यातल्या इतर ठिकाणीही परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यामुळं लसीकरणाची मोहीम अधिक वेगानं राबवणं अत्यंत गरजेचं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 4:00 PM IST

ताज्या बातम्या