पटना, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणींना लोकांना सामोरं जावं लागत आहे. गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात एक अशी घटना घडली की, एक मुलाने चोरी केली तेव्हा त्याला शिक्षा न करता न्यायाधीशांनी त्याला बक्षीस दिलं. बिहारमध्ये नालंदा जिल्हयात ही घटना शुक्रवारी घडली. नालंदा जिल्हयातील बिहारशरीफ इथं एक अल्पवयीन मुलाला चोरी केल्यावरकर्णी पोलिसांनी ताब्यात घेतकी होतं. त्यानंतर मुलाला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. तेव्हा उपाशी असलेल्या आईसाठी चोरी केल्याचं त्याने न्यायाधीशांना सांगितले. यावर अल्पवयिन मुलाला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधीशांनी त्याचे कौतुक केले. एवढंच नाही तर त्याला कपडे आणि धान्यही दिले. हे वाचा- ड्युटीवर हजर होण्यासाठी पोलिसाने 17 दिवसांत चालत कापले 550 किमी अंतर इस्लामपूर इथं राहणाऱ्याया अल्पवयीन मुलाला बाल न्याय न्याय परिषदेचे मुख्य न्यायदंडाधिकारी मानवेंद्र मिश्रा यांच्या कोर्टात हजर केले होते. त्याच्यावर चोरी केल्याचा आरोप होता. जेव्हा न्यायाधीशांनी मुलाची वं बाजू ऐकली आणि चोरीचे कारण ऐकले तेव्हा त्यांनी मुलाला सोडून दिले. मुलाने सांगितले की, त्याच्या वडीलनाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर आईची अवस्था बिकट झाली. तिला स्वतःची कामे करण्यासाठी मुलांवर अवलंबून राहावं लागतं. कुटुंबाची जबाबदारी लहान मुलांवर आहे. आता कामही नसल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व हकीकत ऐकून न्यायाधीशांनी मुलाला आवश्यक ती सर्व मदत करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. न्यायाधीशांच्या आदेशानंतर मुलाच्या कुटुंबाला धान्य आणि इतर सुविधा देण्यात आल्या. तसेच त्याला सुरक्षित घरी सोडण्यात आले. तसेच दर चार महिन्यांनी त्याच्याशी संबंधित प्रगती अहवाल जेजेबी (बाल न्याय परिषद) कडे सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. हे वाचा- नातं माणुसकीचं! पोलीसाने स्कुटीवरून 860 किमी प्रवास करत वाचवले तरुणाचे प्राण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.