नवी दिल्ली, 25 मार्च : बुधवारी पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) कर्फ्यू असूनही लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडले होते. आश्वासनानुसार त्यांना आवश्यक त्या वस्तू घरी पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा लोकांनी दावा केला आहे. एकीकडे सर्व जिल्ह्यांना आवश्यक त्या वस्तू पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे लोक भाजीपाला, फळे आणि किराणा सामान मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत. दरम्यान, पंजाबच्या पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ते 21 दिवस महिलांनी पुरुषांना घरगुती काम करायला शिकवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तो अधिकारी पंजाबी भाषेत बोलताना दिसत आहे. संबंधित - 36 तासात 80 किमीचा पायी प्रवास, लॉकडाऊनदरम्यान घरी पोहोचण्यासाठी मजुरांचे हाल पवन कुमार नावाच्या सहायक उपनिरीक्षकांनी महिलांना विनंती केली आहे की, सध्या कोरोना विषाणूचा आजार पसरत आहे. यासंदर्भात घराबाहेर न पडण्याचं पंतप्रधान व मुख्यमंत्री आवाहन करीत आहेत. इटलीमध्ये किती मृत्यू झाले आहेत हे आपण पाहिले आहे. काहीजण तक्रार करीत आहेत की ते 21 दिवस घरात थांबू शकत नाहीत. त्यांना घरकाम करायल द्या. घर स्वच्छ करणे, रेलिंग स्वच्छ करणे, भांडी घासणे आणि कपडे धुणे आदी काम त्यांच्यावर सोपवा. ते घर स्वच्छ करतील आणि बाहेर कोरोनाची सुतडा साफ होईल. तसेच ते म्हणाले, त्यांना 21 दिवसात पोळ्या लाटायला शिकवा. उद्या एखादी बहीण बाहेर गेली तर तिला काळजी होणार नाही. घरी पोळ्या लाटणारा आहे. तुम्ही घरात बोला, बाहेर आले तर आम्ही बोलू. या अधिकाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे. संबंधित - हातावर होम क्वारंटाइन शिक्का, दुचाकीवर दोन मुलांसह ठाण्यातून पोहोचले रत्नागिरीत!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







