Home /News /maharashtra /

हातावर होम क्वारंटाइन शिक्का, दुचाकीवर दोन मुलं आणि पत्नी, ठाणे ते रत्नागिरी हे कुटुंब पोहोचलं कसं?

हातावर होम क्वारंटाइन शिक्का, दुचाकीवर दोन मुलं आणि पत्नी, ठाणे ते रत्नागिरी हे कुटुंब पोहोचलं कसं?

हे जोडपे आपल्या दोन लहानग्या मुलांना घेऊन कुठल्याही प्रकारचे मास्क न लावता ठाणे येथून खेडमध्ये त्यांच्या गावी येत होते

    चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड, 25 मार्च : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे येथून अनेक लोकं कोकणाकडे धाव घेत आहेत. काही लोक पर्यायीमार्गांचा अवलंब करत कोकणात येत आहेत आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन असा शिक्का मारलेले लोकं देखील घरात न बसता चोरी छुपे मार्गे कोकणात दाखल होत असल्याचे पोलिसांच्या नाका बंदीत आढळून येत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील एका गावात अशाच प्रकारे येणाऱ्या जोडप्याला खेड पोलिसांनी अडवलं. त्यांची विचारपूस करताना त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन असा शिक्का दिसला. हे जोडपे आपल्या दोन लहानग्या मुलांना घेऊन कुठल्याही प्रकारचे मास्क न लावता ठाणे येथून खेडमध्ये त्यांच्या गावी येत होते. हेही वाचा -पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील त्यांना कुठे अडवलं का नाही? असे विचारले असता अनेकदा ते गावी येतात त्यांना पर्यायी मार्ग चांगले माहित असल्याने ते नाका बंदी चुकवून पर्यायी मार्गाने गावी दाखल झाल्याचे उघड झाले. मुंबई - गोवा महामार्गावरील नाकाबंदीत कर्तृव्यावर असणाऱ्या पोलिसांनी आरोग्य विभागाच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना पाठवले आहे. हेही वाचा -संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्येही कोरोनाचं थैमान थांबेना? महाराष्ट्रातील आकडा वाढला रत्नागिरी जिल्हा बंदी झाल्यानंतर पोलिसांनी आणि महसूल यंत्रणेने जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या खेडमधील कशेडी घातला पर्यायी महाड - विन्हेरे - नातुंगर मार्ग आणि पोलादपूर - ओंबळी- आंबवली मार्ग मोठं मोठे दगड टाकून बंद केला आहे. तरीही काही दुचाकीस्वार त्यातूनही रास्ता काढून येत असल्याचे दिसून येत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या