नवी दिल्ली, 25 मार्च : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ..दुपारचं कडक ऊन. सरकारने लॉकडाउन जाहीर केलं आहे. पोलिसांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी रात्री 21 दिवसांचा लॉकडाउन (Lockdown) जाहीर केल्यानंतर पोलिसांनी रात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू केली. असे असूनही अत्यंत अवघड परिस्थिती 20 वर्षीय अवधेश कुमार रस्त्यावर उतरला. पोलीस कारवाईचा धोका पत्करुन तो रस्त्यांवरुन चालत जात आहे. कारण यापुढे गुरुवारपर्यंत तब्बल 36 तासांचा प्रवास त्याला चालतच पार करायचा आहे. अवधेश मंगळवारी रात्री उन्नाव येथील कारखान्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील आपल्या गावी जाण्यासाठी चालत निघाला. तो साधारण गुरुवारी सकाळीच आपल्या घरी पोहोचू शकेल. मध्येच पोलिसांनी वाटेत अडवलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. सुमारे 36 तासांच्या या प्रवासात अवधेश एक किंवा दोन वेळा कुठेतरी थांबू शकतो. अवधेशच्या सोबत उन्नाव येथील त्याच कारखान्यातील जवळपास 20 तरुण व काही वृद्ध आहेत. एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. संबंधित - खुशखबर…नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून टप्पाटप्पाने सुरू होणार जेव्हा अवधेश यांना विचारले की, पंतप्रधान मोदींनी मजूरांना आवाहन केलं की त्यांनी घरी न जाण्याऐवजी तिथेच थांबा. त्यावर तो म्हणाला, ‘मलासुद्धा हे करायचे नाही, परंतु पर्याय नाही.’ अवधेश म्हणाले, ‘पण मी कसं राहू शकतो. मी उन्नावमधील स्टील फॅब्रिकेशन कंपनीत काम करतो. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही राहत होतो. काल रात्री व्यवस्थापनाने आम्हाला जागा रिकाम्या करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही येथे राहू शकत नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे घरी जाण्याशिवाय पर्याय आहे. येथे वाहतुकीची सुविधा नाही. आमच्यातील अनेकजण एकाच गावातील आहोता. शेवटी आम्ही ठरवलं की चालतंच घरी जायचं. 50 वर्षीय राजमल हेदेखील या समूहाबरोबर आहेत, ते म्हणाले, ‘आमच्या गावात काही अन्न आहे, परंतु माझ्या उत्पन्नातून माझं कुटुंब चालते. मी ऐकलं आहे की, यूपी सरकार माझ्यासारख्या लोकांना दरमहा एक हजार रुपये देण्याची योजना आखत आहे. परंतु मी कुठेही नोंदणीकृत नाही. कोणीही माझ्याकडे आले नाही माझ्यासारख्या लोकांसमोर फक्त अंधारच आहे. यांच्याकडे कपडे, पाणी आणि काही बिस्कीट असलेली बॅग आहे. सूर्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या डोक्यावर टॉवेल बांधलेले आहेत. त्यांच्याकडे कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी काहीच नाही. सध्या भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 562 झाली आहे, तर 9 जणांचा यात मृत्यू झाला आहे. संबंधित - लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ‘नेट’डाऊन, डिजिटल प्लॅटफॉर्मनींही घेतला मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







