TCS च्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'वर्क फ्रॉम होम'बाबत घेतला 'हा' निर्णय

TCS च्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'वर्क फ्रॉम होम'बाबत घेतला 'हा' निर्णय

टाटा कंपनीने त्यांच्या अडीच लाख कर्मचाऱ्यांना सध्या वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आहे. त्यात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या आर्थिक संकटाला आव्हान देण्यासाठी टाटा कंपनीने वेगळा मार्ग अवलंबला आहे. टाटा कंपनीने त्यांच्या अडीच लाख कर्मचाऱ्यांना सध्या वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आहे. त्यात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊननंतरही कर्मचाऱ्यांना घरातून काम करता येणार आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने वर्क फ्रॉमचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत ट्रॅक डॉट इन या वेबसाईटने दिले आहे. या वृत्तानुसार टीसीएसमध्ये सध्या जवळ जवळ तीन लाख 55 हजार कर्मचारी काम करत आहेत. यातील 75 टक्के कर्मचाऱ्यांना घरातून काम करायला सांगितले आहे. तर 20 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करावं लागत आहे.

टीसीएसमध्ये राबवण्यात येणाऱ्या या प्रयोगाला मॉडेल 25 असं नाव दिलं असल्याची माहिती टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिली आहे. सुरुवातीला हा प्रयोग पुढच्या पाच वर्षासाठी म्हणजेच 2025 पर्यंत केला जाणार आहे. यात जर अपेक्षित यश मिळालं तर पुढेही त्याच पद्धतीने काम सुरू राहणार आहे.

हे वाचा : कोरोनाविरुद्ध रिक्षाचालकाने लढवली शक्कल, थेट आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

सीईओ सुब्रमण्यम म्हणाले की, 'मोठी कंपनी चालवण्यासाठी पैसे भरपूर लागतात. सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण झाले आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांची कपात करणं हा पर्याय होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही वर्क फ्रॉम होमचा पर्याय एक प्रयोग म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे.'

हे वाचा : कोरोनातून बरं झाल्यावर योद्धा घरी गेला, दारातूनच बायको मुलांना पाहिलं आणि...

संपादन - सूरज यादव

 

First published: April 25, 2020, 11:15 PM IST
Tags: tataTCS

ताज्या बातम्या