कोरोनाविरुद्ध रिक्षाचालकाने लढवली शक्कल, थेट आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

कोरोनाविरुद्ध रिक्षाचालकाने लढवली शक्कल, थेट आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

त्या तरुणाने आपल्या रिक्षाचं डिझाईन असं बदलले की खुद्द आनंद महिंद्राच त्याच्या प्रेमात पडले.

  • Share this:

मुंबई 25 एप्रिल: कोरोनामुळे दररोजच्या व्यवहारातले सगळेच संदर्भ बदलले आहेत. सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचा मुद्दा झालाय. मात्र प्रवासात बसमध्ये, रिक्षात बसताना माणसांमध्ये अंतर कसं ठेवणार हा सगळ्यांपुढे आता प्रश्न आहे. मात्र एका रिक्षाचालकाने त्यावर अशी शक्कल लढवली की महिंद्रा कपंनीचे मालक त्याच्यावर खुश झाले आणि त्यांनी त्या रिक्षाचालकाला थेट कंपनीतच नोकरीची ऑफर दिली. त्या तरुणाचं आयुष्यच पालटणार आहे.

पश्चिम बंगालच्या या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षाचं डिझाईनच बदलून टाकलं. तो ई रिक्षा चालवतो. त्याने त्या रिक्षात प्रवाशांना बसण्यासाठी चार वेगवेगळी कप्पे केले. त्यामुळे त्यांचा ऐकमेकांशी संपर्कच राहत नाही. अगदी कमी खर्चात त्याने ही शक्कल लढवली. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

हा व्हिडीओ आनंद महिंद्रांना आवडला. त्यांनी तो ट्विटकरत त्या युवकाला आपल्या R&D विभागात सल्लागार घेण्याचे निर्देशच आपल्या अधिकाऱ्यांना दिलेत. या आधीही महिंद्रा यांनी अशा प्रकारे अनेक कारागीरांना मदत केली आहे.

राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊनंतरही मुंबईतला धोका कायम असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात आज नवीन 811 रुग्ण सापडला त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 628 एवढी झाली आहे. तर मुंबईने पाच हजार रुग्णांचा टप्पा पार केला.

आज मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या पाच हजार 49 एवढी झाली. तर आतापर्यंत 191 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आणखी काय करता येईल यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. तर देशात कोरोना बळींची संख्या 779 एवढी झाली असून कोरोनारुग्णांची संख्या 24,942 झाली आहे.

हे वाचा - Lockdown : अडलेल्या लग्नाला पोलीस आले धावून, आई वडिलांच्या डोळ्याला लागल्या धारा

राज्यात आज 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील मुंबईत 13 रुग्ण आहेत पुणे महापालिकेच्या हद्दीत चार तर मालेगाव येथील एक पुणे ग्रामीण मध्ये एक पिंपरी-चिंचवडमध्ये एक धुळे आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत एक लाख आठ हजार 972 रुग्णांच्या तपासणी केल्या असून त्यात सात हजार 628 जण पॉझिटिव आहे. मुंबईत 24 तासात 602 रूग्ण आढळले आहेत. शुक्रवारी मुंबईत एकूण 4447 रूग्ण होते आज ती संख्या 5049वर गेली आहे.

First published: April 25, 2020, 10:44 PM IST

ताज्या बातम्या