जाहिरात
मराठी बातम्या / देश / ...आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, 'पंजासमोरील बटन...', Video व्हायरल

...आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, 'पंजासमोरील बटन...', Video व्हायरल

...आणि भरसभेत भाजप नेते ज्योतिरादित्य म्हणाले, 'पंजासमोरील बटन...', Video व्हायरल

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केले, पण…

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 01 नोव्हेंबर : मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये पोटनिवडणूक (By-Election) प्रचारादरम्यान  भाजपचे (BJP) खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भरसभेत काँग्रेसची घोषणा देण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या अखेरीस लोकांना आवाहन करताना ‘काँग्रेस पक्षाच्या समोरील पंजा बटन दाबून विजयी…’ असं आवाहनच केलं.

जाहिरात

पण, आपल्याकडून बोलताना चूक झाली हे लक्ष्यात येताच त्यांनी तातडीने दुरुस्ती केली आणि ‘3 तारखेला  भाजपच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवाराला विजयी करा’ असं आवाहन करून भाषण आवरलं. पण, ज्योतिरादित्य यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 4 वर्षाच्या चिमुरडीने गायलं वंदे मातरम्; पंतप्रधान मोदींनीही शेअर केला VIDEO ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पोटनिवडणूक होत आहे. 15 वर्षांनंतर 2018 मध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. पण, अवघ्या 15 महिन्यांमध्ये कमलनाथ सरकार कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला  आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत 26 समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सर्वांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे मार्च महिन्यात काँग्रेस सरकार कोसळले आणि पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत आलं. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात