Home /News /national /

अखेर सरकारला आली जाग; कोरोनासंदर्भातील 'तो' निर्णय घेतला मागे

अखेर सरकारला आली जाग; कोरोनासंदर्भातील 'तो' निर्णय घेतला मागे

सिनेमा हॉलमध्ये एका सीट सोडून प्रेक्षकांना बसवण्यात येणार आहे. 50 टक्के क्षमतेसह सिनेमा हॉल खुली केली जाणार आहेत.

सिनेमा हॉलमध्ये एका सीट सोडून प्रेक्षकांना बसवण्यात येणार आहे. 50 टक्के क्षमतेसह सिनेमा हॉल खुली केली जाणार आहेत.

कोरोनाच्या काळात अनेक अविवेकी निर्णयही घेतले जात आहेत. मात्र एका सरकारनं असा निर्णय मागे घेण्याचं स्वागतार्ह पाऊल उचललं आहे.

    तमिळनाडू, 17 जानेवारी : कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचं (social distancing) काटेकोर पालन करण्याचं आवाहन जगभरातील तज्ज्ञ आणि शासनव्यवस्था करत आहेत. मात्र अनेकदा काहीवेळेस चुकीचे निर्णय घेतलेलेही आढळत आहेत. असाच एक निर्णय आता तामिळनाडू सरकारनं (Tamilnadu government) मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. भारतातील तामिळनाडू सरकारनं असाच एक निर्णय नव्या वर्षाच्या सुरुवातीला 4 जानेवारी रोजी घेतला होता. या निर्णयाला तळमळीनं विरोध करणारं एक पत्रही (letter) तिथल्या कार्यरत डॉक्टरनं (doctor) लिहिलं होतं. तामिळनाडूमध्ये राज्य सरकारनं नव्या वर्षाच्या सुरवातीलाच चित्रपटगृहांमध्ये (Cinema theater) 100 टक्के सीट्स भरण्याची परवानगी दिली होती. हे ही वाचा-लोटांगण घालून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी दिल्या अमित शहांविरोधात घोषणाबाजी, VIDEO या निर्णयासंदर्भांनं तामिळनाडू सरकार आणि सिनेसृष्टीतील कलाकारांना (actors) अत्यंत तिखट शब्दात त्यांना सुनावलं होतं. पुदुच्चेरीच्या एका संस्थेतील अर्विनाथ श्रीनिवास या निवासी डॉक्टरनं (resident doctor) हे पत्र लिहिलं होतं. खूप व्हायरल (Viral letter) झालेल्या या पत्राला अनेकांनी सोशल मीडियावर (social media) पाठिंबा दर्शवला होता. आता तामिळनाडूततील इ के पलानीस्वामी  सरकारनं 100 टक्के सीट्स भरण्याचा निर्णय मागे घेतला असून केवळ 50 टक्के सीट्सच भरल्या जातील असं जाहीर केलं आहे. मात्र केंद्र सरकारनंही या निर्णयाबद्दल नापसंती दर्शवली होती. केंद्रानं तामिळनाडू सरकारला हा निर्णय मागे घ्यायला सांगितलं होतं. हे ही वाचा-Train to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा या निर्णयानंतर जवळपास 9 महिन्यानंतर राज्यात पूर्ण क्षमतेनं सिनेमागृहं सुरू होणार होती. मात्र यातून कोरोनाच्या केसेस वाढतील या भीतीपोटी केंद्रानं या निर्णयाला मागे घेण्यास सांगितलं. तामिळनाडूमध्ये आजवर कोरोनाच्या 8,22,370 इतक्या केसेस समोर आल्या आहेत. यातील 8,02,385 लोक रिकव्हर झाले आहेत. 12,177 लोकांचा कोरोनानं या राज्यात मृत्यू झाला आहे. सध्या ऍक्टिव्ह केसेस 7808 इतक्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Resident Doctors, Tamil nadu

    पुढील बातम्या