नवी दिल्ली, 17 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केवडिया (Gujrat) याठिकाणी असणाऱ्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity) ला भेट देणं सुलभ व्हावं याकरता देशातील विविध भागातून केवडियामध्यये आठ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. या गाड्या केवडियाला वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की देशाच्या आणि रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे की अशा प्रकारच्या गाड्यांना एकत्र हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे आदर्श पू्र्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
Prime Minister Narendra Modi flags off eight trains connecting Statue of Unity in Kevadia, Gujarat with different regions of the country, via video conference. pic.twitter.com/QkzIB0bnKG
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काही स्टेशनच्या नव्या इमारतींचे देखील उद्घाटन केले. या नव्या स्थानकांचे फोटो देखील नरेंद्र मोदी यांनी फोटो शेअर केले होते.
गुजरातमधील रेल्वे संबंधित प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल देखील उपस्थित होते. पीएमओकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. केवडिया हे ग्रीन बिल्डिंगचे प्रमाणपत्र असलेले देशातील पहिले स्टेशन आहे.