मराठी बातम्या /बातम्या /देश /

Tamil Nadu Assembly Elections 2021 : अभिनेता कमल हासन 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार

Tamil Nadu Assembly Elections 2021 : अभिनेता कमल हासन 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार

अभिनेते कमल हासन (Kamal Hasan) यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते कोणत्या मतदारसंघातून लढवणार याची उत्सुकता संपली आहे.

अभिनेते कमल हासन (Kamal Hasan) यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते कोणत्या मतदारसंघातून लढवणार याची उत्सुकता संपली आहे.

अभिनेते कमल हासन (Kamal Hasan) यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते कोणत्या मतदारसंघातून लढवणार याची उत्सुकता संपली आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 12 मार्च : तामिळनाडूमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका  (Tamil Nadu Assembly Elections 2021) खास आहेत. जे. जयललीता (J. Jayalalithaa) आणि एम. करुणानिधी (M. Karunanidhi) या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच अनेक वर्षे तमिळ सिनेमा (Tamil Cinema) गाजवलेले अभिनेते कमल हासन (Kamal Hasan) यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

कमल हासन त्यांची पहिली विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार याची उत्सुकता संपली आहे. कोईम्बतूर दक्षिण (Coimbatore South) मतदारसंघातून हासन निवडणूक लढवणार आहेत. मक्कल निधी मय्यम (Makkal Needhi Maiam) या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये हासन यांचं नाव आहे.

कमल हासन यांच्या पक्षाचे चिन्ह काय?

कमल हासन यांचा पक्ष या निवडणुकीत एकूण 154 जागा लढवत आहे. त्यांच्या दोन्ही मित्रपक्षाला त्यांनी प्रत्येकी 40-40 जागा सोडल्या आहेत. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. कमल हासन यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने टॉर्च हे चिन्ह दिलं आहे. यापूर्वी 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील आयोगाने त्यांना टॉर्च हेच चिन्ह दिले होते. त्या निवडणुकीत पक्षाला 3.77 टक्के मत मिळाली होती.

कमल हासन यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राज्यभर प्रवास करुन पहिल्या टप्प्याचा प्रचार पूर्ण केला आहे. वाढत्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी अनेकदा तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुक पक्षावर जोरदार टीका केली आहे.

( वाचा : 'तृणमूल काँग्रेस म्हणजे...', ममतांविरुद्ध अर्ज भरताच भाजपा नेत्याचा हल्लाबोल )

तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाला 2 मे रोजी लागेल. राज्यात भाजपाने सत्तारुढ अण्णा द्रमुक पक्षासोबत युती केली आहे. तर काँग्रेसची प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकशी युती आहे.

द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांच्या आघाडीच्यामध्ये तामिळनाडूचे राजकारण आजवर विभागले गेले आहे. त्या आघाडीच्या थेट लढतीमध्ये कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष तिसरा पर्याय म्हणून समोर येतो का? हे निकालाच्या दिवशी म्हणजेच 2 मे रोजी स्पष्ट होईल.

First published:

Tags: Assembly Election 2021, Kamal hassan, Tamil nadu, Tamil nadu Election