नवी दिल्ली 6 जून: भारत आणि चीनमध्ये लद्दख जवळच्या सीमेवरून जो तणाव निर्माण झाला होता तो कमी करण्यासाठी आज चर्चेला सुरूवात झाली. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ ही चर्चा झाली. यात भारताचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरींदर सिंग यांनी केलं. चीनच्या दबावाला भारताने भीक घातली नसून भारत आपल्या अधिकार क्षेत्रात कुठलीही लुडबूड सहन करणार नाही असं सिंग यांना चीनी अधिकाऱ्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या असलेल्या नियंत्रण रेषा आणि ताबा रेषा धुडकावत चीन अतिक्रमण करत जमीनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. लद्दाख जवळच्या सीमेजवळ चीनने गेल्या काही दिवसांमध्ये दंडेली केली होती. चीनचे सैनिक अतिक्रमण करत भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारीही झाली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या मोठा तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेच्या बाजूने जातोय असं दिसत असल्याने चीन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
Talks between military commanders of India and China in Moldo on the Chinese side of Line of Actual Control are over. The Indian delegation led by 14 Corps Commander Lt Gen Harinder Singh is returning to Leh: Indian Army Sources pic.twitter.com/G5sKaxxJm9
— ANI (@ANI) June 6, 2020
मात्र कुठल्याही परिस्थितीत चीनची मुजोरी सहन करायची नाही आणि दबावाला बळी न पडता ठाम राहायचं अशी भारताची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळविण्याचाही भारताचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनासाठी PM Cares मध्ये BJP व सपा नेत्यांनी दिले बनावटी चेक अम्फान आणि निसर्गनंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून अलर्ट