जाहिरात
मराठी बातम्या / देश / लाखोंची फसवणूक! कोरोनाच्या लढाईसाठी PM Cares मध्ये BJP व सपा नेत्यांनी दिले बनावटी चेक

लाखोंची फसवणूक! कोरोनाच्या लढाईसाठी PM Cares मध्ये BJP व सपा नेत्यांनी दिले बनावटी चेक

लाखोंची फसवणूक! कोरोनाच्या लढाईसाठी PM Cares मध्ये BJP व सपा नेत्यांनी दिले बनावटी चेक

कोरोनाच्या लढाईसाठी अनेक अभिनेते, व्यावसायिक आणि नेत्यांनी PM Cares मध्ये कोटी रुपयांची मदत दिली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मथुरा, 6 जून : उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कोरोना विषाणू साथीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. भारती जनता पार्टी (भाजपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) नेत्यांनी साथीच्या नावावर चार लाख रुपयांचे बनावट धनादेश दिले होचे.  मिळालेल्या माहितीनुसार, आता उपजिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मथुरा पोलीस ठाण्यात भाजपच्या एक आणि दोन सपा नेत्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाच्या सांस्कृतिक कक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष दीपक गौर, सपाशी संबंधित युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय सचिव विभोर गौतम आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजकुमार रावत यांनी बनावट धनादेश दिले होते. कोतवाली प्रभारी अवधेश प्रताप सिंह म्हणाले की, त्यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल व त्यानंतर चौकशी केली जाईल. बड्या उद्योगपतींनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी पीएम केअर फंड आणि सीएम केअर फंड तयार केला गेला आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांसह बड्या उद्योगपतींनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचबरोबर बऱ्य़ाच नेत्यांनी सीएम केअर फंडातही आर्थिक मदत केली आहे. स्वत: मायावती, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप सुप्रीमो यांनी पक्षाच्या आमदारांना गरजूंच्या मदतीसाठी 1-1 कोटी रुपये देण्यास सांगितले होते. हे वाचा- अम्फान आणि निसर्गनंतर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून अलर्ट अवघ्या काही तासांत पृथ्वीवर धडकणार कोरोनापेक्षाही मोठं संकट, NASAनं दिली माहिती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात