मराठी बातम्या /बातम्या /देश /कोरोना लस घेतली तर मिळणार दारू; तळीरामांसाठी नवा नियम

कोरोना लस घेतली तर मिळणार दारू; तळीरामांसाठी नवा नियम

दारू खरेदी करताना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवावं लागणार.

दारू खरेदी करताना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवावं लागणार.

दारू खरेदी करताना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवावं लागणार.

    हैदराबाद, 27 सप्टेंबर : कोरोना महामारी (Covid-19) अजून सुरू आहे पण आता दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही वर्तवली जात असली तरीही जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे हे आपल्याला जाणवत असेलच. कोरोनाच्या काळात सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाउन (Lockdown) सुरू झाला आणि नंतर हळूहळू एकेका गोष्टीला परवानगी मिळायला लागली. नंतर लसीकरण सुरू झालं आणि प्रवासालाही सरकारने परवानगी दिली. एसटी बसचा असो किंवा विमानाचा प्रवास त्याचं तिकीट (Travel Ticket Booking) काढण्यापूर्वी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं. त्यानुसार सामान्यांचा प्रवासही सुरू झाला. जर तुम्हाला सांगितलं की दारु खरेदी (Buying Liquor) करण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र (Vaccination Certificate) दाखवणं बंधनकारक केलं आहे तर विश्वास बसेल का? पण हे खरं आहे.

    तामिळनाडूतील नीलगिरी जिल्ह्यात प्रशासनाने सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असेल तर आधार कार्ड आणि लसीकरणाचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. तमिळनाडूमध्ये राज्य सरकारची कंपनी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (Tamil Nadu State Marketing Corporation - TASMAC) अधिकृतपणे दारू विक्रीचं काम करते. या दुकानांतून मिळणारी दारू हवी असेल तर कोविड-19 प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

    हे वाचा - कोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा

    नीलगिरी जिल्ह्याने 1 सप्टेंबर 2021 पासून ही योजना सुरू केली असून लसीकरणाचं प्रमाण वाढावं म्हणून ही योजना लागू केल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात अशी योजना राबवणारा नीलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

    नीलगिरीच्या जिल्हाधिकारी जे. इनोसंट दिव्या यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, "आमच्या जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सुमारे 97 टक्के लोकसंख्येला आम्ही लस दिली आहे. सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. तुम्ही लस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस दारू पिऊ शकणार नाही असा समज पसरल्यामुळे दारुडे लोक लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे जिल्हा 100 टक्के लसीकृत करण्याचं आमचं ध्येय पूर्ण होत नव्हतं त्यामुळे आम्ही ही योजना जाहीर केली जेणेकरून अधिक लसीकरण होऊ शकेल. लशीचा किमान एक डोस घेतलेल्या व्यक्तीने SRF ID आणि त्याचा फोन नंबर सरकारी दुकानातील विक्रेत्याला दाखवला की त्याला दारू खरेदी करता येते"

    हे वाचा - Coronavirus : धोका वाढला! वैज्ञानिकांना आढळला कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट

    त्या म्हणाल्या, "आमच्या जिल्ह्यातल्या 97 टक्के जनतेने कोरोनाप्रतिबंधक लसीचा किमान पहिला किंवा दोन्ही डोस घेतले आहेत. उर्वरित लोकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली"

    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Liquor stock