गेल्या दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार पसरवला आहे. अनेकांची कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. अद्यापही कोरोनाची टांगती तलवार आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणाऱ असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2/ 7
आतापर्यंत कोरोनाचे अनेक व्हेरिएंट समोर आले आहे. यातून कोरोनाच्या परिणामांचं रुप बदलताना दिसतं. आता आणखी एक व्हेरिएंट समोर आल्याची माहिती सांगितली जात आहे. अलीकडे कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं देशात शिरकाव केला होता.
3/ 7
वैज्ञानिकांच्या टीमने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल नागरिकांना सतर्क केलं आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट R.1 सापडल्याने चिंता वाढली आहे.
4/ 7
अद्याप तरी या नव्या व्हेटिएंटचे रुग्ण कमी असल्याचं दिसत आहे. मात्र तरीही अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. हा नवा व्हेरिएंट अधिक संक्रमित करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
5/ 7
रिपोर्टनुसार R.1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट नाही. गेल्या वर्षी जपानमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला होता. त्यानंतर जगातील अन्य देशांमध्येही हा आढलला. आतापर्यंत संयुक्त राज्य अमेरिकेतील जवळपास 35 देशांमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
6/ 7
कोरोनाचा R.1 व्हेरिएंट धोकादायक असू शकतो, असं सांगितलं जात आहे. मात्र लसीकरण झाल्यास या व्हेरिएंटचा फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
7/ 7
R.1 सार्स सीओवी 2 व्हायरसचा नवा असून यात म्युटेशन दिसतं. कोणत्याही नव्या स्ट्रेनप्रमाणे R.1 मूळकोरोना व्हायरसच्या तुलनेत लोकांना वेगळ्या प्रकारे संक्रमित करू शकतो.