कानपूर, 1 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून विविध व्यासपीठांवरुन नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि एनपीआर (NPR), एनआरसी (NRC) विरोधात वक्तव्य करीत आहे. काही दिवसांपूर्वी स्वराला एनआरसीसंदर्भात पश्न विचारला होता, तिने दिलेलं उत्तर समाज माध्यमांवर ट्रोल झालं होतं. यानंतर मात्र स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ झाली आहे. कानपूरचे वरिष्ठ अधिवक्ता विजय बक्शी यांनी कानपूरातील सीएमएम-७ कोर्टात स्वरा भास्कर हिच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
विजय बक्शी यांनी युट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओच्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे. स्वरा हिच्या विरोधात आयपीसी कलम 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 'कोर्टाने या प्रकरणातील माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 20 मार्च ही तारीख दिली' असं बक्शी यांनी सांगितले.
व्हिडीओचा दाखला...
विजय बक्शी यांनी सांगितले, ''स्वरा भास्कर आपल्या चिथावणीखोर भाषणांमुळे भारत सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय दोन संप्रदायांमध्ये विवाद निर्माण करण्यासाठी भडकावू भाषणं देत आहे. या कारणांमुळे समाजात वाद उद्भवत आहे. मी देखील या संदर्भात स्वरा भास्करचा एक व्हिडीओ पाहिला होता, ज्यामुळे दिल्लीत दंगलीची परिस्थिती उद्भवली. या दंगलीत हेड कॉन्स्टेबल रतन लाल आणि आईबीचे अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या सर्व कारणांमुळे मी ही केस दाखल केली'' असे बक्शी यांनी सांगितले.
सरकारकडून घेणार परवानगी
विजय बक्शी यांनी सांगितले की, 'सीआरपीसी २०० अंतर्गत वादीचे म्हणणे मॅजिस्ट्रेटच्या समोर मांडले जाते. मी माझे म्हणणे मांडल्यानंतर साक्षीदारांचे म्हणणे ऐकले जाईल. यानंतर मी सरकारकडे राजद्रोहाचे प्रकरण पुढे चालविण्याची परवानगी घेईन. सध्या सुरू असलेल्या कन्हैया कुमार प्रकरणात केजरीवाल सरकारने मंजुरी दिली आहे. यानंतरच राजद्रोहचे प्रकरण चालते'.
हे वाचा - पाकसाठी दुष्काळात तेरावा महिना! फेसबुक, ट्विटर, गुगलची इमरान खान यांना थेट धमकी
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.