जाहिरात
मराठी बातम्या / देश / Sushma Swaraj Birth Anniversary : सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त मोदींना शेअर केला तो किस्सा...

Sushma Swaraj Birth Anniversary : सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त मोदींना शेअर केला तो किस्सा...

Sushma Swaraj Birth Anniversary : सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त मोदींना शेअर केला तो किस्सा...

सुषमा स्वराज यांचं वक्तृत्व कौशल्य, चिकाटी आजही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पंतप्रधान मोदींच्या आईंनी त्यावेळीच हे ओळखलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

Sushma Swaraj Birth Anniversary : प्रभावी वक्तृत्वाने संपूर्ण संसदेवर प्रभाव टाकणाऱ्या माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांची आज 70वी जयंती आहे. सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना नमन केलं जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही फेसबुकवर एक किस्सा शेअर केला आहे. मोदींनी शेअर केला तो किस्सा… सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, आता मी जालंधरहून रॅली संपवून परतत आहे. आज सुषमा स्वराज यांची जयंती आहे. त्यांच्याशी संबंधित एक किस्सा मला आज आठवला, वाटतं तुमच्यासोबतही तो शेअर करूया.

ही घटना साधारण 25 वर्षांपूर्वी घडली. त्यावेळी मी भाजपमध्ये संघटनेचं काम करीत होतो आणि सुषमाजी गुजरातमध्ये निवडणुकीच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या वडनगर या माझ्या गावीही गेल्या होत्या. येथे त्या माझ्या आईला भेटल्या. त्यावेळी माझ्या पुतण्याच्या घरात मुलगी जन्माला आली होती. हे ही वाचा- BJP आमदाराविरोधात गुन्हा दाखल, मुलीचं अपहरण केल्याचा आरोप ज्योतिषांनी नक्षत्र पाहून तिचं नाव काय ठेवायचं हे देखील ठरवलं होतं. नाम नक्की करण्यात आलं होतं. घरातील सदस्यांनीही ज्योतिषांनी दिलेलं नाव ठेवण्याचं ठरवलं. मात्र सुषमाजींनी भेट झाल्यानंतर माझ्या आईने घरातील नव्या मुलीचं नाव सुषमा ठेवण्याचं ठरवलं. माझी आई फार शिकलेली नाही, मात्र विचारांनी ती खूप आधुनिक आहे. त्या वेळी तिने ज्या पद्धतीने स्वत:चा निर्णय सुनावला ते आजही मला लक्षात आहे. आज सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात