मराठी बातम्या /बातम्या /देश /भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

आमदारावर पाटण्यातील एका मुलीचे अपहरण (Girl Kidnapped) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटणा, 13 फेब्रुवारी: बिहारमधील पश्चिम चंपारण (BJP MLA Vinay Bihari) जिल्ह्यातील लौरिया विधानसभा (Lauria assembly constituency) मतदारसंघातील भाजप आमदार विनय बिहारी (MLA Vinay Bihari) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदारावर पाटण्यातील एका मुलीचे अपहरण (Girl Kidnapped) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पक्षाकडून आलेल्या लेखी तक्रारीवरून, आरोपी आमदार विनय बिहारी यांच्या विरोधात पाटणा येथील आगमकुआन पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 366 आणि 120(बी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी विनय बिहारी यांची पत्नी चंचला बिहारी आणि त्यांचा एक नातेवाईक राजीव सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडे दिलेल्या अर्जानुसार, मुलीबाबत विनय बिहारी यांच्याशी संपर्क साधला असता, तुला कुठे जायचे आहे, ज्याच्याकडे तक्रार करायची आहे तेथे जा, माझे कोणीही काही करणार नाही, असं म्हटलं.

लग्नाच्या 15 दिवसातच नववधू दागिने घेऊन छू मंतर, समोर आलं धक्कादायक वास्तव

प्रत्यक्षात मुलीच्या अपहरणप्रकरणी एफआयआर दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी तिचा शोध लागलेला नाही. याबाबत आमदार विनय बिहारी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मला याबाबत काहीही माहिती नाही, मी राजीव सिंह यांचा काका आहे. पीडितेचे कुटुंबीय माझ्यावर विनाकारण आरोप करत आहेत.

बीजेपी के विधायक विनय बिहारी और दो अन्य लोगों के खिलाफ पटना की एक लड़की के अपहरण मामले में पुलिस ने केस दर्ज किया है (फाइल फोटो)

पुढे ते म्हणाले, जर या लोकांना गुन्हा दाखल करायचा असता तर त्यांनी राजीव सिंहच्या पालकांवर केला असता. दुसरीकडे राजीव सिंह यांच्या आईने सांगितले की, मला याबाबत काहीही माहिती नाही. माझा मुलगा त्याच्या काकांकडे राहतो, त्याने जे केले त्याला त्याचे काका जबाबदार आहेत, आम्ही नाही.

आगमकुआन पोलीस ठाण्याचे अध्यक्ष म्हणतात की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: BJP