Home /News /national /

solar eclipse : ग्रहणकाळातही 'हे' मंदिर भाविकांसाठी खुलं, काय आहे यामागची कहाणी

solar eclipse : ग्रहणकाळातही 'हे' मंदिर भाविकांसाठी खुलं, काय आहे यामागची कहाणी

ग्रहण संपल्यानंतर शिप्रा घाटावर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे.

    उज्जैन, 21 जून : यंदाच्या वर्षातील सर्वात मोठं आणि पहिलं सूर्यग्रहण आज आहे. भारतातील काही भागांमध्ये कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. या ग्रहण कालावधीदरम्यान भारतातील जवळपास सगळी मंदिरं बंद ठेवण्याची प्रथा आहे. अशुभ किंवा सूतक असल्यानं ग्रहणकालावधीमध्ये मंदिरं बंद ठेवली जातात. उज्जैनी इथलं एक मंदिर मात्र ग्रहणकाळातही भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. सूर्यग्रहण असूनही त्यांनी हे मंदिर बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला. उज्जैनी इथल्या बाबा महाकल मंदिरात भस्म आरती नंतरही धूप आरती केली जाते. यावेळी महाकालाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई आहे, दुसरीकडे ग्रहण काळातही भगवान बाबा महाकालचे दर्शन सुरळीत चालू असतं. ग्रहणकाळातंही भक्तांना देव दर्शन देईल असा विश्वास आहे. बाबा महाकाल हे येणाऱ्या वाईटांचा काळ आहेत. त्यामुळे मंदिरावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही असं सांगितलं जातं. बाबा महाकाल हे मृत्यूच्या भूमीचे राजा आहेत. त्यामुळे कोणतंही संकट ओढवणार नाही असा समज असल्यानं इथल्या मंदिराचे दरवाजे बंद केले जात नाहीत. ग्रहण संपल्यानंतर शिप्रा घाटावर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. पण कोरोनाचा संसर्ग टाळाण्यासाठी घाटावर स्नान करण्यासाठी बंदी घालण्यात आलं आहे. याशिवाय मंदिर आणि घाट परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे वाचा-PHOTOS : सूर्यग्रहण काळातील अंधश्रद्धा आणि सत्य... जाणून घ्या 'या' 7 गोष्टी हे वाचा-Solar Eclipse 2020 Live : सूर्यग्रहणाला सुरुवात, महाराष्ट्रात या भागात पाहू शकता संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus update, Solar eclipse, Solar eclipse time, Ujjain

    पुढील बातम्या