PHOTOS : सूर्यग्रहण काळातील अंधश्रद्धा आणि सत्य... जाणून घ्या 'या' 7 गोष्टी
सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. भारतातून कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
|
1/ 7
सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. भारतातून कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
2/ 7
सूर्यग्रहणादरम्यान अनेक अंधश्रद्धा किंवा अपशकून होत असल्याचं सांगितलं जातं. मात्र असं कोणताही प्रकार होत नाही.
3/ 7
गर्भवती महिलांनी या काळात ग्रहण पाहू नये किंवा खाऊ नये असं सांगितलं जातं. मात्र त्यांच्यावर या ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही.
4/ 7
ग्रहण काळात अन्न-पाणी सेवन करू नये अशी अंधश्रद्धा आहे. ग्रहण काळात अन्न-पाणी सेवन करू शकता.
5/ 7
ग्रहणानंतर घर शुद्ध करावं अन्न पाणी टाकून द्यावं असं सांगितलं जातं. ग्रहणामध्ये घरं अशुद्ध होत नाही ही संकल्पना चुकीची आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.
6/ 7
ग्रहणाला घाबरून कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही किंवा विशेष होम हवनही करायलाच हवं असं काही नाही.
7/ 7
ग्रहण पाहताना मात्र सोलार गॉगल्सचा वापर नक्की करा. नाहीतर डोळ्यांना त्रास होऊ शकतो.