मुंबई, 7 मार्च : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घडामोडी नेहमीच आपल्या मनात आकर्षण आणि कुतूहल निर्माण करतात. ग्रहणाच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात आणि खगोलशास्त्रात सारखंच महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. त्यामुळे असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. पण, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो. 2023 मधील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल (गुरुवार) रोजी होणार आहे. या ग्रहणाचा सुतक कालावधी, ग्रहणाचा प्रकार आणि ग्रहणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कधी आहे सूर्यग्रहण? ज्योतिष दिनदर्शिकेनुसार, या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनंतर संपेल. सुतक काळाबद्दल विचार केला तर, या ग्रहणाचा सुतककाळ आपल्यासाठी वैध ठरणार नाही. कारण हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही. हे उपछाया सूर्यग्रहण असेल. आशियातील काही देशांसोबतच ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिका इत्यादी भागातून हे ग्रहण दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचा वेगवेगळ्या राशींवर प्रभाव पडू शकतो. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. पण, तरीही ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीच्या व्यक्तींना या सूर्यग्रहणाचा फटका बसू शकतो. घर बांधताना लक्षात ठेवा वास्तुचे हे नियम, स्वर्गासारखे सुंदर होईल तुमचे जीवन कोणत्या राशींवर होणार परिणाम? हे सूर्यग्रहण मेष, कन्या आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चांगलं नसेल, असं म्हटलं जात आहे. या ग्रहणाच्या वेळी सूर्य मेष राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मेष राशीच्या व्यक्तींच्या आरोग्य, संपत्ती आणि प्रवास इत्यादींवर परिणाम होऊ शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव जाणवू शकतो आणि त्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मिथुन आणि वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मात्र, हे ग्रहण शुभ असल्याचं म्हटलं जात आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना विविध लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूजा करताना शंखनाद करण्याचं काय आहे महत्त्व; भक्तांच्या हाकेला धावून येतात देव केव्हा आहे चंद्रग्रहण? या वर्षी, एकूण चार ग्रहणं होणार आहेत. त्यापैकी दोन चंद्रग्रहणं आणि दोन सूर्यग्रहणं असतील. दुसरं सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला होणार आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 5 मे रोजी होईल. रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणारं हे ग्रहण पहाटे एक वाजेपर्यंत असेल. तर, दुसरं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होईल.