नवी दिल्ली, 3 डिसेंबर : सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) राजकारणात सक्रीय सुरुवात करणार आहेत. त्यांनी सोमवारी ट्विट करून, 31 डिसेंबर रोजी आपल्या पार्टीची घोषणा करण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ते आपला राजकीय पक्ष (Rajinikanth Political Party) लाँच करतील. 2021 मध्ये तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे रजनीकांत यांचा राजकीय पक्षाचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांनी 30 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचं आणि राजकीय पक्ष तयार करण्याचे संकेतही दिले होते.
रजनीकांत यांची 30 नोव्हेंबर रोजी आपल्या फोरमसह स्वत:च्या राजकीय प्रवासाच्या शक्यतांचा विचार करण्यासाठी बैठक झाली होती. ही बैठक चेन्नईमध्ये रजनी मक्कल मंडरमच्या जिल्हा सचिवांसोबत झाली होती. त्यावेळी रजनी मक्कल मंडरमच्या प्रतिनिधींनी मिटिंगमध्ये 2021 मध्ये रजनीकांत यांना निवडणूकीसाठी उभं राहावं असा आग्रह करण्यात आला होता. त्यांनी याबद्दल कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत काहीही न बोलण्याचं, तसंच सर्वांना धैर्य ठेवण्याचं सांगितलं होतं.
ஜனவரியில் கட்சித் துவக்கம்,
டிசம்பர் 31ல் தேதி அறிவிப்பு. #மாத்துவோம்_எல்லாத்தையும்_மாத்துவோம்#இப்போ_இல்லேன்னா_எப்பவும்_இல்ல pic.twitter.com/9tqdnIJEml
— Rajinikanth (@rajinikanth) December 3, 2020
2021 मध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूका पाहता, भाजपसह अनेक राजकीय पक्ष त्यांच्या घोषणेच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांनी 31 डिसेंबर रोजी रजनीकांत यांच्या स्वत:च्या पक्षाच्या घोषणेनंतर भाजपला धक्का बसू शकतो. आता रजनीकांत नेमका कोणात पक्ष स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.