Home /News /national /

मोठी बातमी ! गुजरातच्या द्वारकामध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक

मोठी बातमी ! गुजरातच्या द्वारकामध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त; ठाण्यातील भाजी विक्रेत्याला अटक

Crores of rupees drugs seized: पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज गुजरातमध्ये जप्त करण्यात आले आहे.

    अहमदाबाद, 11 नोव्हेंबर : गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त (drugs seized in Gujarat) करण्यात आला आहे. गुजरात पोलिसानी ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ही 300 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील द्वारका (Dwarka Gujarat) जिल्ह्यातील खंभालिया येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. (Crores of rupees drugs seized in Dwarka Gujarat) सागरीमार्गे तस्करीचा संशय पाकिस्तानामधून हे ड्रग्ज सागरीमार्गे भारतात आणले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 44 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सज्जाद असे असून तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे. राजकोट क्षेत्राचे पोली उपमहानिरीक्षक (डीआयजी) संदीप सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी सज्जाद याला अंमली पदार्थांच्या साठ्यासह अटक केली आहे. त्याच्याकडून हेरॉईन आणि मेथामेफटामाइन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईनंतर बुधवारी पोलिसांनी देवभूमी द्वारका जिल्ह्यातून आणखी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. वाचा : Mumbai विमानतळावर मोठी कारवाई, आई आणि मुलीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सज्जाद याला अटक केली. त्याच्याकडील बॅगमधून 19 पॅकेट्स जप्त करण्यात आली आहे. तक्यामध्ये 11.483 किलोग्रॅम हेरॉईन आणि 6.168 किलोग्रॅम मेथामेफटामाइन आढळून आले आहे. तर इतर दोघांकडून 17.65 किलोग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सज्जाद हा ठाण्यातील मुंब्रा परिसरातील भाजी विक्रेता असून तो तीन दिवसांपूर्वी अंमली पदार्थांचा साठा घेण्यासाठी येथे आला होता असंही पोलिसांनी सांगितले. या कारवाईनंतर आम्ही इतर ठिकाणी छापेमारी केली. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला अशाच प्रकारचे 47 पाकिटे आढळून आली. ही सुद्धा सर्व पाकिटे आम्ही जप्त केलेली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त अलीकडेच डीआरआयने गुजरातच्या मुंद्रा येथून दोन कंटेनरमधून 2 हजार 922.22 किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यासोबतच काही अफगाणिस्तानी नागरिकांचीही चौकशी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या हेरॉईनच्या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. इनपुटच्या आधारे डीआरआयने दोन कंटेनर अडवले आणि गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या एक्सपर्टच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करण्यात आली. द हिंदूच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, एक्सपर्ट्सने सामानाची तपासणी केली आणि हेरॉईन असल्याची पुष्टी केली. त्यानंतर हा सर्व अमली पदार्थाचा साठा जप्त केला
    First published:

    Tags: Crime, Drug case, Gujarat

    पुढील बातम्या