Home /News /national /

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन गदारोळ, ISIS आणि बोको हरामशी केली हिंदुत्वाची तुलना

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन गदारोळ, ISIS आणि बोको हरामशी केली हिंदुत्वाची तुलना

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salaman Khurshid New Book Controversy) यांनी लिहिलेल्या 'सनराइज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya) या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. या पुस्तकावरुन सर्वत्र गदारोळ होत असल्याचं दिसून येत आहे...

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salaman Khurshid New Book Controversy) यांनी लिहिलेल्या 'सनराइज ओव्हर अयोध्या' (Sunrise Over Ayodhya) या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. या पुस्तकातल्या एका प्रकरणात त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिस (ISIS) आणि बोको हराम (Boko Haram) या संघटनांशी केली आहे. त्यावरून सर्वत्र गदारोळ माजला असतानाच न्यायालयाच्या त्या निर्णयाचा अर्थ लावण्याची जबाबदारी त्यांची होती, असं विधानही सलमान खुर्शीद केलं. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सलमान खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात 'द सॅफ्रॉन स्काय' (The Saffron Sky) नावाच्या प्रकरणात हिंदुत्वाविषयी (Salaman Khusrshid on Hinduism) लिहिलं आहे. 'सध्याच्या युगात हिंदुत्वाचं राजकीय स्वरूप सनातन धर्म आणि ऋषी-मुनींच्या प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत असून, हिंदुत्वाचं हे राजकीय रूप इसिस आणि बोको हरामसारख्या जिहादी संघटनांसारखे आहे,' असं त्यात त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की 'जे व्हायचं होतं ते झालं. ज्यांना हिंदू धर्म माहीत नाही, ते यावर प्रतिक्रिया देतील, पण ज्यांना हिंदू धर्म माहीत आहे, ते यावर काहीही प्रतिक्रिया देणार नाहीत. ज्यांना हिंदू आणि इस्लाम धर्मही कळत नाही त्यांच्याशी यावर काय वाद घालायचा? आपल्या सार्वजनिक जीवनात दोन्ही समाजात आदानप्रदान होत असतं. त्यात निर्माण झालेला दुरावा कायमचा भरून काढण्याची संधी अयोध्या प्रकरणावरच्या निर्णयानं दिली आहे.' हे वाचा-मुलीचा जोडीदार पसंत नसल्याने Honor Killing, कुटुंबीयांनी ओलांडली क्रौर्याची सीमा 'रामराज्य ही एक व्यापक कल्पना आहे,' असं नमूद करून ते पुढे म्हणाले, की 'रामराज्याची संकल्पना केवळ हिंदूंपुरती मर्यादित नाही, तर ती व्यापक कल्पना आहे. जसं हिंदू धर्मात रामराज्य आहे, तसं इस्लाममध्ये निजाम-ए-मुस्तफाची चर्चा आहे. हा एकच विचार, एकच मार्ग आहे. केवळ शब्दच्छल करण्यापेक्षा सत्यापर्यंत पोहोचता यावं, यासाठी या पुस्तकाची मदत झाली पाहिजे, असं मला वाटतं.' हे वाचा-'मी पद्म पुरस्कारासाठी अपात्र...' आनंद महिंद्रांच्या या ट्वीटने पुन्हा जिंकलं मन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी सलमान खुर्शीद यांच्या 'सनराइज ओव्हर अयोध्या' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितलं, की '6 डिसेंबर 1992 रोजी जे काही घडलं, ते अत्यंत चुकीचं होतं. आपल्या राज्यघटनेला बदनाम करणारी ही घटना होती. यामुळे दोन समाजांत मोठी दरी निर्माण झाली. मी शंभर वेळा म्हणेन की ती घटना अत्यंत चुकीची होती. सुमारे 300 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ज्याप्रमाणे जेसिकाला कोणीही मारलं नाही, त्याचप्रमाणे बाबरी मशीद कोणीही पाडली नाही.'
First published:

Tags: Ayodhya, ISIS

पुढील बातम्या