नवी दिल्ली, 22 मे : देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात जून-जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांमध्येही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यातचं काँग्रेस प्रवक्ता संजय झा (Sanjay Jha) यांनाही कोरोनासारख्या आजाराची बाधा झाली आहे. काँग्रेस नेता संजय झा यांची कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी Covid -19 प़ॉझिटिव्ह असल्याचे चाचणीवरुन समोर आले आहे. माझ्यात कोणतेही लक्षणं नाहीत. मी पुढील 10 ते 12 दिवस होम क्वारंटाईनमध्ये आहे. कृपया सामुदायिक प्रसाराच्या जोखमीबाब दुर्लक्ष करू नका. आपण सर्वांना स्वत:ची काळजी घ्या.
गेल्या काही दिवसात अनेक कोरोना योद्ध्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यात काल राज्यातील तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सर्वांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसकडे दुर्लक्ष करू नका. सध्या देशातील 80 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही मात्र तपासणीत ते पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते. हे वाचा - RBI नंतर SBI देखील ग्राहकांना खूशखबर देण्याची शक्यता, लवकरच होऊ शकेल EMI कमी कोरोनाला हरवलं, आता बर्फाचा डोंगर सर करायला गिर्यारोहक तयार

)







