जमशेदपूर, 27 मे : गरिबी आणि उन्हाचे चटके सोसल्यानंतर यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या अनेक कथा वाचल्या पण लाखो रुपयांची नोकरी सोडून न्यायाधीश होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. हिना यांनी UP PCSJ ची परीक्षा 2019ची न्यायाधीशाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार केली आहे. हिना झारखंडच्या जमशेदपूर इथल्या रहिवासी आहेत. एका बड्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली पण नोकरीत समाधान मिळेना. याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितलं. अखेर तिनं नोकरी सोडली आणि न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. मी डिसेंबरमध्ये नोकरी सोडली आणि जानेवारीची तयारी सुरू केली. यूपी पीसीएस जे परीक्षेत प्रथमच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. परंतु प्रीलिम्सला चांगले गुण मिळाले. त्यानंतर एका वर्षात यशस्वी होऊन यूपी पीसीएस जे 2019 परीक्षेत न्यायाधीश झाले. एका वर्षाच्या तयारीत, प्रथमच 2018 मध्ये बिहार, झारखंड राजस्थान न्यायिक प्रिलिम्स परीक्षेत निवड झाली. हे वाचा- Success story: कोचिंग क्लास न करता जिद्दीच्या जोरावर नर्स झाली IAS परीक्षेसाठी कशी केली तयारी… हिना म्हणाली, प्रत्येक राज्यात परीक्षा सारख्याच असतात. पण जीके आणि जीएस अशा असतात. या विषयांच्या विभक्ततेमुळे परीक्षा कठीण आहे. म्हणून, ज्या राज्यात परीक्षा देतो, त्या राज्याशी संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. सुरुवातीपासून अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. आधी प्रिलिम्स आणि मग मेन्स असं न करता दोन्हीसाठी अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, म्हणून सुरुवातीपासूनच कायदा वाचा. केस कायद्याकडेही लक्ष द्या. परीक्षेची तयारी करताना एकाच सोर्सचा वापर करावा. जितका सोर्स तेवढं अधिक गुंतागुंतीचं होतं. हेना केवळ चालू घडामोडींवर अधिक चांगल्या लक्षात राहण्यासाठी व्हिडिओ पाहतात हे वाचा- उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.