मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर-आलिया फॅन्ससाठी Bad News: लग्न ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर; 'या' दिवशी जुळणार रेशीमगाठ

रणबीर-आलिया फॅन्ससाठी Bad News: लग्न ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर; 'या' दिवशी जुळणार रेशीमगाठ

या दोघांचा लग्नसोहळा लवकरच पार पडेल असं त्यांच्या फॅन्सना वाटत होतं. पण...

या दोघांचा लग्नसोहळा लवकरच पार पडेल असं त्यांच्या फॅन्सना वाटत होतं. पण...

या दोघांचा लग्नसोहळा लवकरच पार पडेल असं त्यांच्या फॅन्सना वाटत होतं. पण...

मुंबई, 09 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये या वर्षाअखेर एक बिग फॅट वेडिंग अपेक्षित होतं. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री अलिया भट्ट (Alia Bhatt) या वर्षअखेर एकमेकांशी लग्नगाठ (Wedding of Ranbir and Alia) बांधतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्या. या आधीही या दोघांच्या लग्नाच्या तारखांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरुच होत्या. पण आता मात्र या दोघांच्या फॅन्सना त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी आणखी थोडी वाट बघावी लागणार आहे. या दोघांनी आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर फॅन्सच्या भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत. खरंतर दिवाळीमध्ये आलियानं रणबीरबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे आता या दोघांचा लग्नसोहळा लवकरच पार पडेल असं त्यांच्या फॅन्सना वाटत होतं. पण आता मात्र पुन्हा तारीख पुढे गेली आहे.

पापराझी विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया आणि रणबीरचं लग्न आता एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टमध्ये रणबीर आणि आलियाच्या फोटोंचा कोलाज लावण्यात आला आहे आणि त्यावर एक लाल पट्टी लावली आहे. ‘लग्न एप्रिल 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे’ असं या लाल पट्टीवर लिहीलं आहे. तर या पोस्टमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ (Katrina kaif) यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे या दोघांच्या लग्नाचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वर्षअखेरपर्यंत विकी आणि कॅटरीनाही लग्नाच्या बंधनात बांधले जाणार असल्याची शक्यता आहे.

800 वर्षे जुन्या किल्ल्यात कतरिना-विकी बांधणार लग्नगाठ! पाहा Inside Photo

व्हायरल भय्यानीनं शेअर केलेल्या फोटोत अलिया भट्ट एअरपोर्टवर दिसत आहे. तर रणबीर कपूर एका क्लिनिकबाहेर असतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. रणबीर आणि आलियानं आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे लग्न या दोघांनी आपलं लग्न पुढे ढकलल्याचीही माहिती देण्यात आली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलल्यानं या दोघांचे फॅन्स अर्थातच निराश झाले आहेत. हे दोन्ही लोकप्रिय स्टार्स या वर्षअखेरीपर्यंत नक्की लग्न करतील अशी खात्री फॅन्सना वाटत होती. बॉलीवूडचा हा लग्नसोहळा नक्कीच देखणा होणार यात शंका नाही. त्यामुळे लग्नसोहळ्याबद्द्ल अनेक कयास बांधले जात होते. यावर युजर्सनं अनेक इंटरेस्टींग कमेंट्स केल्या आहेत. ‘हे लग्नही ‘ब्रम्हास्त्र’ (Bramhastra )प्रमाणे सतत लांबणीवर पडत चाललं आहे’. तर हे दोन्ही स्टार लग्न करणारच नाहीत फक्त प्रसिध्दीसाठी लग्नाचं नाटक करत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे रणबीर आणि आलिया एकमेकांबरोबरच लग्न करणार अशा जोरदार चर्चा बॉलीवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेतच. सध्या हे दोन्ही कलाकार त्यांच्या कामात व्यस्त आहेत. हे दोघेहीजण ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमाही त्यांच्या लग्नाप्रमाणेच सतत पुढे ढकलला जात आहे. या सिनेमातून रणबीर आणि आलियाची जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. ब्रम्हास्त्र सिनेमाशिवायही या दोघांच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. आलियाची बहुचर्चित फिल्म ‘गंगूबाई काठियावाडी’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून आलियाला बऱ्याच अपेक्षा आहेत.

अर्थातच बॉलीवूडच्या इतर स्टार कपलच्या लग्नाप्रमाणे अलिया – रणबीरच्या लग्नाची आणि लग्न सोहळ्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्या फॅन्सना आहे. आता हे दोघे नक्की कधी तारीख अंतिम करतात हे बघणं महत्वाचं आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor