मराठी बातम्या /बातम्या /देश /

…आणि कोरोनासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ 30000 कोटीला विकायला काढलं, OLX वरील पोस्टनंतर पोलिसांची धावाधाव

…आणि कोरोनासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ 30000 कोटीला विकायला काढलं, OLX वरील पोस्टनंतर पोलिसांची धावाधाव

एका स्थानिक वृत्तपत्रात याबाबत वृत्त पाहिल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्यवस्थापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
वडोदरा, 5 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाचं (Covid -19) संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जनतेकडून मदतीचं आवाहन केलं आहे. त्यातच गुजरातमधील एका बातमीमुळे लोकांचे डोळे मोठे झाले आहे. एका नागरिकाने गुजरातमध्ये उभारलेले  जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity ) विकायला काढल्याची बाब समोर आली आहे. गुजरातमधील केवाडिया कॉलनीतील वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीनिमित्त जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' उभारण्यात आली आहे. एका नागरिकाने मात्र कोविड – 19 च्या लढ्यात वैद्यकीय मदत म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी 30000 कोटी रुपयांना विक्री करीत असल्याची जाहिरात ओएलएक्सवर (OLX) टाकली आहे. ओएलएक्सवर एका अज्ञाताने लिहिले आहे की, ‘आपात्कालिन! रुग्णालय आणि आरोग्याच्या उपकरणांसाठी तातडीने पैशांची गरज असल्याने स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे.’ संबंधित - 433/748...राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांमधील 57% रुग्ण केवळ मुंबईत याबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीचे व्यवस्थापन रविवारी पोलीस ठाण्यात पोहोचले व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार केली. इंडियन एक्सप्रेसमध्ये यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सरकारची बदनामी करण्याच्या हेतूने कोणतेही अधिकार नसताना स्टॅच्यू ऑफ युनिटी विकण्याबाबत ओएलएक्सवर जाहिरात टाकली. धक्कादायक बाब म्हणजे ओएलएक्सने ही पोस्ट न तपासता पुढे केली. त्यामुळे ओएलएक्सचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्यवस्थापकांनी तक्रार दाखल केली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे. संबंधित - लॉकडाऊनमध्ये घरपोच दारू देतो सांगून 30 हजारांचा ऑनलाइन गंडा
First published:

Tags: Gujrat

पुढील बातम्या