मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

433/748...राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांमधील 57% रुग्ण केवळ मुंबईत

433/748...राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांमधील 57% रुग्ण केवळ मुंबईत

मुंबईत वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे

मुंबईत वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे

मुंबईत वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 5 एप्रिल : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 3500 च्या वर गेला आहे. त्यात मृतांचा आकडा 75 च्या पुढे गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यातही इतर राज्याच्या तुलनेत केवळ मुंबई (Mumbai Covid -19) शहराचा आकडा खूप मोठा आहे. यामुळे येत्या काळात बीएमसीला अधिक कडक पावले उचलावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासात 8 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत 108  रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून आज दिवसभरात मुंबईत ५३ रुग्णं वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांत 8 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या 8 जणांपैकी 2 जण वयोवृद्ध होते. तर या 2 जनांसह एकूण 6 जण आधीपासूनच खूप दिवस आजारी होते. त्यामुळे आता मुंबईत एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या 433 इतकी झाली आहे. आता पर्यंत केवळ मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित -मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 30 जणांचा बळी, 103 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आज आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह बीएमसी 81 पीएमसी 18 औरंगाबाद 4 एएनएजीआर 3 केडीएमसी 2 ठाणे 2 उस्मानाबाद 1 वसई 1 इतर 1 एकूण 113 देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण 3578 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून यापैकी 275 जण बरे झाले आहेत. याशिवाय 83 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित - धक्कादायक! तबलिगीसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या
First published:

पुढील बातम्या