मुंबई, 5 एप्रिल : येत्या 15 एप्रिलपर्यंत मद्यविक्रीस बंदी असल्याने तळीरामांचे चांगलेच हाल होत आहे. विविध प्रकाराने ते दारू मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असाच प्रयत्न एका व्यक्तीला महागात पडला आहे. सध्या अनेक ठिकाणी गैरपद्धतीने मद्य विक्री सुरू असली तरी त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो. 24 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन (Lockdown) घोषित केलं. यानंतर देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच मद्यविक्रीची दुकानं बंद आहेत. सध्या देश कोरोनाशी (Covid -19) लढत असताना केंद्र सरकारने येत्या 15 एप्रिलपर्यंत मद्यविक्री बंद ठेवली आहे. मात्र अनेक ठिकाणी गैरपद्धतीने दारु विक्री केली जात आहे. अशातच एका 37 वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन 30 हजारांचा गंडा घालण्यात आला. याबाबत व्यक्तीने आग्रीपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. संबंधित - मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 30 जणांचा बळी, 103 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्सम व्यक्तीला 29 मार्च रोजी फोनवर मिस्ड् कॉल आला होता. या क्रमांकावर व्यक्तीने पुन्हा फोन केला. पीडित व्यक्ती हा भायखळाच्या एका दुकानात नेहमी दारू विकत घेत होता. यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दुकानदार असल्याचे भासवले. दारू मिळतेय म्हणून पीडित व्यक्तीही खूष झाला. फोनवरील व्यक्तीने पीडित व्यक्तीला 20000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. थोड्यावेळाने त्याने पुन्हा कॉल केला आणि आणखी 10000 रुपये ट्रान्सफर करावयास सांगितले. थोळ्यावेळाने पीडित व्यक्तीने कॉल केल्यास त्याचा क्रमाक बंद येत होता. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या व्यक्तीने आग्रीपाडा पोलीस स्थानकात तक्रार केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. नवराष्ट्रमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. संबंधित - धक्कादायक! तबलिगीसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.