मराठी बातम्या /बातम्या /देश /नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी महात्मा गांधींचा पुतळा तात्पुरता स्थलांतरित

नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी महात्मा गांधींचा पुतळा तात्पुरता स्थलांतरित

केंद्र सरकारच्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाची स्वतःची संसद बांधण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाची स्वतःची संसद बांधण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाची स्वतःची संसद बांधण्यात येणार आहे.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : नवीन संसद भवनाच्या (Parliament) बांधकामासाठी नुकताच संसदेच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ असणारा महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा पुतळा तात्पुरता हटवून तिसऱ्या क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापन करण्यात आला आहे. 16 फूट उंचीचा हा पितळेचा पुतळा असून, शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांनी हा तयार केला आहे. राम सुतार यांनीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वंत उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं (Statue Of Unity) डिझाइन केलं आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळयाचं अनावरण 1993 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

मंगळवारी, तात्पुरतं पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचं राज्यसभा सचिवालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

महात्मा गांधी यांच्या या पुतळ्याबद्दल माहिती सांगताना शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार म्हणाले, 1984 च्या सुमारास बसलेल्या अवस्थेतील महात्मा गांधी यांचा पुतळा बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या लोकनिर्माण विभागाच्या वतीने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात राम सुतार यांचं शिल्प निवडलं गेलं. सध्या संसद भवनात 16 पुतळे आहेत, त्यापैकी बहुतांश पुतळे राम सुतार यांनी घडवले आहेत. यामध्ये सरदार पटेल, भगत सिंह, छत्रपती शिवाजी महाराज, रणजित सिंह, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. अनेक ऐतिहासिक शिल्पं माझ्या वडिलांनी घडवली आहेत, असं ते म्हणाले.

(वाचा - अडथळ्यांवर मात करत अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीचं काम सुरू)

जेव्हा लोक संसद भवनातील महात्मा गांधी यांचा हा भव्य पुतळा पाहतात, तेव्हा अशीच मूर्ती घडवून द्या असा आग्रह अनेक लोक आमच्याकडे धरतात, असंही अनिल सुतार यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या तब्बल 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा (Central Vista) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाची स्वतःची संसद बांधण्यात येणार आहे. जुने संसदभवन आहे तसेच ठेवून त्याच्या शेजारी तब्बल 65 हजार चौरस मीटरवर संसदेची नवी आणि भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. 2022 साली म्हणजेच स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होतील त्यावेळी या नव्या संसदेचं लोकार्पण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

(वाचा - ठरलं! दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस)

दिल्लीतील ल्युटियन्स भागात ब्रिटीश काळात उभारण्यात आलेल्या सध्याच्या संसदभवनाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. एडविन ल्युटियन्स आणि हर्बट बेकर या स्थापत्यशास्त्रज्ञांनी या इमारतीचं डिझाइन तयार केलं होतं. 10 डिसेंबर नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.

First published:
top videos

    Tags: Mahatma gandhi, Parliament