जाहिरात
मराठी बातम्या / देश / स्टॅलिन, केसीआर आणि जगनमोहन हे दक्षिणात्य नेते का झालेत दिल्लीत सक्रीय? संकेत समजून घ्या

स्टॅलिन, केसीआर आणि जगनमोहन हे दक्षिणात्य नेते का झालेत दिल्लीत सक्रीय? संकेत समजून घ्या

स्टॅलिन, केसीआर आणि जगनमोहन हे दक्षिणात्य नेते का झालेत दिल्लीत सक्रीय? संकेत समजून घ्या

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या गेल्या आठवडाभरातील दिल्ली दौऱ्यांनी राजकीय पंडितांना थक्क केले आहे. काहीजण याला राष्ट्रीय राजकारणातील प्रतिमा उजळण्यासाठीची कसरत मानत आहेत, तर काहीजण याला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीशी जोडत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 10 एप्रिल : गेल्या आठवडाभरात दक्षिण भारतातील तीन मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत ज्या प्रकारे सक्रियता दाखवली, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे एकाच काळात झालेले दिल्ली दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. काहीजण याला राष्ट्रीय राजकारणात आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न मानत आहेत, तर अनेक राजकीय पंडित याला 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीशी जोडून पाहत आहेत. काँग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना या तिन्ही प्रादेशिक पक्षांच्या सक्रियतेकडे राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. एमके स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते स्टॅलिन अलीकडेच तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी ‘अण्णा कलैग्नार अरिवलायम’चे उद्घाटन केले. तामिळनाडूबाहेर उघडणारे द्रमुकचे हे पहिले कार्यालय आहे. स्टॅलिन यांनी “डीएमके आणि राष्ट्रीय राजकारणातील द्रविड मॉडेलच्या अपरिहार्य भूमिकेचे आकर्षक प्रतीक” असे वर्णन केले. याशिवाय त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही केले, ज्याच्या कार्यक्रमाला राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला, पिनाराई विजयन आणि तेजस्वी यादव उपस्थित होते. इतकेच नाही तर स्टॅलिन यांनी सीएम अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीतील सरकारी शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट दिली. राजकीय विश्लेषक स्टॅलिन यांच्या या भूमिकेकडे राष्ट्रीय स्तरावर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी स्वत:ला तयार करत आहेत. सोबतच भाजपशी लढण्यासाठी एक आघाडी तयार करण्यासाठी आम आदमी पक्षासोबतचे सहकार्य वाढवत असल्याचे बोलले जात आहे. द्रमुक सध्या 24 खासदारांसह लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. करुणानिधींच्या द्रमुक आणि जयललिता यांच्या एआयएडीएमकेने केंद्रात एनडीए आणि यूपीए सरकारे बनवण्यात आणि पाडण्यात अनेकदा भूमिका बजावली आहे. चेन्नईस्थित पत्रकार संध्या रविशंकर म्हणतात, “स्टॅलिन कदाचित 2024 च्या निवडणुकीच्या रनअपमध्ये दिल्लीत पक्षांना एकत्र करत असतील, जसे त्यांचे वडील करुणानिधी यांनी 80 आणि 90 च्या दशकात केले होते. स्टॅलिन यांना पंतप्रधानपदाची आकांक्षा नसली तरी किंगमेकर बनण्याचे स्वप्न आहे. राजकीय विश्लेषक सुमंत सी रमण यांच्या मते करुणानिधींच्या विपरीत, केंद्रीय राजकारणात स्टॅलिन यांना चांगली संधी आहे. गांधी घराण्याशी त्यांची जवळीक हा यात एक प्लस पॉइंट ठरू शकतो. मात्र, त्यांचा हिंदीला विरोध काही अडथळे नक्कीच निर्माण करू शकतो. स्मृती इराणींना काँग्रेस नेत्याने विमानात विचारला महागाईवर प्रश्न; पाहा, त्या काय म्हणाल्या? वायएस जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या पक्ष YSRCP चे लोकसभेत 22 खासदार आहेत. स्टॅलिनप्रमाणे जगन मोहनही लोककल्याणाचा मंत्र जपून काम करतात. विविध योजनांच्या माध्यमातून ते गरीब आणि मध्यमवर्गीयांवर खुलेआम पैसा खर्च करतात. यातून त्यांचा राजकीय फायदाही झाला. मात्र, जगन यांचे केंद्रासोबतचे नाते अनाकलनीय राहिले आहे. राजकीय विश्लेषक गली नागराज यांचे म्हणणे आहे की जगन यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते देखील भाजपमध्ये मिसळत आहेत. काँग्रेसची स्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि दुसरीकडे जगन ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांनाही त्यांच्या योजनांसाठी केंद्राकडून पैशांची गरज आहे. त्याच वेळी, भाजपलाही जगन यांच्या माध्यमातून टीडीपी आणि चंद्राबाबू नायडूं यांच्यावर वचक ठेवायचा आहे, कारण ते जगन यांना चंद्राबाबूंपेक्षा कमी त्रास देणारे मानतात. …म्हणून राहुल गांधींनी 100 वेळा विचार करायला हवा, मायावतींचे जोरदार प्रत्युत्तर के. चंद्रशेखर राव (KCR) स्टॅलिनप्रमाणेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनाही केंद्रीय राजकारणात स्वत:साठी संधी दिसत आहे. दिल्लीत जम बसवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच त्यांचे पीआरओ संजय कुमार झा यांना तैनात केलं होतं. केसीआर स्वतः 2 एप्रिलपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि धान खरेदीच्या मुद्द्यावरून ते केंद्राशी दोन हात करण्याच्या मनस्थितीत असल्याचे मानले जात आहे. कोरोना महामारीच्या काळात बेपत्ता झालेले केसीआर अचानक सक्रिय झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली, जी 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून झाली नव्हती. अनेक सामाजिक योजनाही सुरू केल्या. दिल्लीत ते भाजपविरोधात धरणे धरताना दिसले होते. या सर्व गोष्टी केसीआर यांच्या राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित असल्याचे हे सर्व राजकीय पंडित सांगत आहेत. मात्र, तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकाही 2023 मध्ये होणार आहेत. मात्र, दक्षिणेतील या तिन्ही प्रादेशिक पक्षांसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी करणेही आव्हानांनी भरलेले आहे. द्रमुकच्या एका मंत्र्यावर या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आणखी दोघांवर लवकरच कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात 2जी प्रकरण सुरू आहे. जगन हे आधीच सीबीआय आणि ईडी प्रकरणात अडकले आहे. अशा परिस्थितीत हे नेते राष्ट्रीय मंचावर स्वत:ला उभे करण्यात किती यशस्वी होतात, हे पाहावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात