जाहिरात
मराठी बातम्या / देश / स्मृती इराणींना काँग्रेस नेत्याने विमानात विचारला महागाईवर प्रश्न; पाहा, त्या काय म्हणाल्या?

स्मृती इराणींना काँग्रेस नेत्याने विमानात विचारला महागाईवर प्रश्न; पाहा, त्या काय म्हणाल्या?

स्मृती इराणींना काँग्रेस नेत्याने विमानात विचारला महागाईवर प्रश्न; पाहा, त्या काय म्हणाल्या?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. (LPG Price Increasing) याचा परिणाम खाद्यपदार्थांसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 एप्रिल :  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. (LPG Price Increasing)  याचा परिणाम खाद्यपदार्थांसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही झाला आहे.  आता लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. याबाबत विरोधकांकडून सातत्याने सरकारला घेरले जात आहे.

 याच दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इरानी (Union Minister Smriti Irani) आणि काँग्रेस नेत्या नेट्टा डिसूजा (****Netta D’Souza) या विमान प्रवासात एकमेकांच्या समोरासमोर आल्या. यावेळी काँग्रेस नेत्या डिसूजा यांनी मंत्री स्मृती इराणींना वाढत्या इंधनांच्या किंमतीसंदर्भात प्रश्न केला. ही पूर्ण घटना दिल्ली ते गुवाहाटी विमानात घडली. तर या घटनेचा व्हिडिओ काँग्रेस नेत्या डिसूजा यांनी ट्विट केला आहे.

जाहिरात

डिसूजा यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओत त्यांनी स्मृती इराणी यांच्यासोबतचा संवाद रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे. त्या म्हणाल्या की, गुवाहाटी जातानाच्या वेळी मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांची भेट झाली. जेव्हा मी त्यांना वाढत्या एलपीजीच्या किंमती संदर्भात प्रश्न केला, तर त्यांनी याचे खापर लस, स्वस्त धान्य तसेच गरीबांवर फोडले. हेही वाचा -  …म्हणून राहुल गांधींनी 100 वेळा विचार करायला हवा, मायावतींचे जोरदार प्रत्युत्तर सातत्याने वाढ - व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काँग्रेस नेत्या नेट्टा डिसूजा या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना प्रश्न विचारत आहेत. तर इराणी यावेळी म्हणतात दिसत आहेत की, माझा रस्ता अडवत आहात. त्याचवेळी त्यांनी एलपीजीच्या किमतीसंदर्भात प्रश्न केला असता तर त्या म्हणाल्या की, कृपया खोटे बोलू नका. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तेलाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत पेट्रोल 105.41 प्रतिलिटर मिळत आहे. तर डिझेल 96.67 प्रतिलिटर दराने मिळत आहे. या किमती ४ दिवसांपूर्वीच्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात