Home /News /national /

...म्हणून राहुल गांधींनी 100 वेळा विचार करायला हवा, मायावतींचे जोरदार प्रत्युत्तर

...म्हणून राहुल गांधींनी 100 वेळा विचार करायला हवा, मायावतींचे जोरदार प्रत्युत्तर

कांँग्रेस नेते राहुल गांधी यांची बसपाच्या प्रमुख मायावती (bsp chief mayawati) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मायावती यांनी राहुल गांधी (rahul gandhi) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  लखनऊ, 10 एप्रिल : कांँग्रेस नेते राहुल गांधी यांची बसपाच्या प्रमुख मायावती (bsp chief mayawati) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मायावती यांनी राहुल गांधी (rahul gandhi) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, या वृत्ताला नकार दिला आहे. तसेच काँग्रेस कधीच दलितांच्या बाजूने उभी राहिली नाही, अशी टीकाही मायावती यांनी काँग्रेसवर केली. राहुल गांधी यांनी बसपाच्या विरोधात बोलण्याआधी 100 वेळा विचार करायला हवा. त्यांचे हे वक्तव्य ते जातीवादी विचाराचे आहेत, असे दर्शवते. काँग्रेसने दुसऱ्या पक्षांपेक्षा आपल्या पक्षाची चिंता करायला हवी. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसची परिस्थिती ही मांजर ओरबाडल्यासारखी झाली आहे. काय म्हणाले होते राहुल गांधी -  काँग्रेस पक्षाने बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती (bsp chief mayawati) यांना उत्तर प्रदेशमध्ये युती करण्याची आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्या बोलल्याही नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी शनिवारी केला. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि पेगासस यांच्याकडून निर्माण होत असलेल्या दबावामुळे मायावती दलितांच्या आवाजासाठी लढत नाही आहेत आणि त्यांनी भाजपला मार्ग मोकळा करुन दिला आहे, असा दावाही त्यांनी केला. हेही वाचा - मायावतींना दिली होती 'ही' ऑफर; राहुल गांधींचा दावा राहुल गांधी जातीवादी मानसिकतेचे - पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, मला हे माहित झाले आहे की राहुल गांधी यांनी पक्ष आणि पक्षाचे प्रमुख यांच्यावर जी टीका केली आहे त्यावरुन ते जातीवादी मानसिकतेचे आहे हे दर्शवते. काँग्रेसने कधीच दलितांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला उंचावण्यासाठी काहीही केलेले नाही. दलितांना आरक्षाचाही पूर्ण लाभ दिला नाही. मायावती पुढ म्हणाल्या की, हे लोक आपल्या विखुरलेल्या घराला सांभाळू शकत नाही आहे. राजीव गांधी सुद्धा कांशीराम जी यांना सीआयए एजंट म्हणाले होते. ते म्हणतात की, बसपा प्रमुख सीबीआय, ईडीला घाबरते. मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, हे राहुल गांधी जे म्हणत आहेत ते खोटे आहे. भाजपविरुद्ध लढण्याची काँग्रेसची वृत्ती उदासीन आहे. भाजप आणि कंपनीच्या लोकांना 'साम दाम दंड भेड' करत विरोधी पक्ष नसलेले सरकार चालवायचे आहे.
  त्या म्हणाल्या की, 2007मध्ये जेव्हा बसपाचे पूर्ण बहुमताचे सरकार होते, तेव्हा केंद्रात कांग्रेसचे सरकार होते. अयोध्या प्रकरणात राज्यातील परिस्थितीत बिघडायला हवी, यासाठी केंद्राने आम्हाला सुरक्षा दलपण दिले नव्हते. राज्यातील परिस्थिती खराब करुन राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे, अशी काँग्रेसची इच्छा होती.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Politics, Rahul gandhi, UP Election

  पुढील बातम्या