कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनाप्रमुखाचं वक्तव्य

कुत्र्याच्या मृत्यूसाठीही मोदी जबाबदार का?, श्रीराम सेनाप्रमुखाचं वक्तव्य

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवर हे वादग्रस्त विधान केलं आहे.

  • Share this:

कर्नाटक, 18 जून :  'कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार कसे?,' असं वादग्रस्त वक्तव्य श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून मुतालिक यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवर एका सभेत बोलताना हे वादग्रस्त विधान केलं आहे.  'काँग्रेसची सत्ता असताना कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्यावेळी कोणीही काँग्रेसच्या नाकर्तेपणावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं नाही. आता मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का आहेत? असा सवाल विचारला जात आहे. कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला. तर त्याला मोदी जबाबदार कसे असतील?,' असा सवाल मुतालिक यांनी केलाय.

पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

तसंच गौरी लंकेशच्या हत्येशी श्रीराम सेनेचा काहीही संबंध नाही. ज्या चारही हत्या झाल्या. महाराष्ट्रात दोन आणि कर्नाटकात दोन त्यावेळी सत्ता काँग्रेसची होती. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही, गौरी लंकेश यांच्या हत्येशी मोदींचा संबंधच काय ? असा सवालही त्यांनी केला.

धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली, मारेकऱ्याची कबुली

मात्र, आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होईल याची जाणीव झाल्यानंतर गौरी लंकेश यांची तुलना मला कुत्र्यासोबत करायची नव्हती अशी सारवासारव त्यांनी केली. गौरी लंकेश यांची गोळी झाडून हत्या करणारा परशुराम वाघमारे हा आमच्या संघटनेचा नाही असा दावाही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या परशुराम वाघमारेनं धर्मरक्षणासाठी आपण हत्या केल्याची कबुली दिली.

First published: June 18, 2018, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading