पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

पानसरे, कलबुर्गी, लंकेश हत्येत एकाच शस्त्राचा वापर

  • Share this:

15 जून : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात शेवटचा सहावा संशयित परशुराम वाघमारेला अटक झालीयs. वाघमारेनंच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचं एसआयटीच्या तपासातून समोर आलंय.

गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचा दावा एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलाय.

फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झालं असल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तिघांच्या हत्येसाठी जे शस्त्र वापरण्यात आलं ते अद्याप सापडलेले नाही.

First published: June 16, 2018, 12:01 AM IST

ताज्या बातम्या